महाराष्ट्रमुबई

ठाणे शहराला स्वच्छ शहर ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु…

ठाणे शहराला स्वच्छ शहर ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु…

स्टार भारत लाईव एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी

प्रफुल्ल पहूरकर

ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय अशी ओळख असलेल्या ठाणे शहराला स्वच्छ शहर अशी नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या इंडीयन स्वच्छता लीग उपक्रमांतर्गत पालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये ठाण्यातील हजारो विद्यार्थ्यांनी रविवारी फलकांद्वारे स्वच्छतेचे संदेश दिले. त्याचबरोबर पर्यावरणपूरक प्रकल्पाच्या प्रतिकृती, गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा आणि स्वच्छतेची शपथ असे वैविध्यपुर्ण उपक्रमही पार पडले. शिवाय, सफाई काम करणाऱ्या कांता ठाकूर, अनिल ठाकूर यांचा अभिनेता भाऊ कदम सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच या दाम्पत्याच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध लाभदायी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत हे उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button