बुलढाणासांस्कृतिक
शिवसेना शाखा ओपनिंगला खामगाव तालुक्यामध्ये युवकांचा उदंड प्रतिसाद…..

शिवसेना शाखा ओपनिंगला खामगाव तालुक्यामध्ये युवकांचा उदंड प्रतिसाद…..
जी डी रोकडे जिल्हा प्रतिनिधी.
खामगाव- बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव जी जाधव यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा व विविध भूमिपूजन सोहळा करिता 1कोटी 13 लाख रुपये किंमतीचे भूमिपूजन सोहळा 16 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. खामगाव तालुक्यामध्ये दिवसेंदिवस शिवसेनेत तरुण युवकांचा कल वाढतांना दिसत आहे त्याच्या अनुषंगाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये सकाळी 11 ते रात्री 11वाजे पर्यंत तालुक्यामध्ये 16 शाखा फलकाच्या अनावरण पार पडले. या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हाप्रमुख संजय भाऊ अवताडे, जिल्हा उपप्रमुख राजूभाऊ मिरगे खामगाव तालुकाप्रमुख राजेंद्रजी बगे व इतर शिवसैनिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते..



