*ई पीक पाहनी अशिक्षित व विना मोबाईल धारक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

*ई पीक पाहनी अशिक्षित व विना मोबाईल धारक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी*
*इ पिक पाहनी पासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जबाबदार राहाणार कोण?* स्टार भारत लाईव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाचे खूप मोठे ओझे कमी केले असून ते शेतकऱ्यांच्या डोक्यावर टाकलेले आहे पहिले पिकांची पाहनी आणि पीक फेरा हे महसूल व कृषी खात्याकडून होत होते परंतु आता स्वतः शेतकऱ्यांना मोबाईल ॲप द्वारे पाहणी करण्याचे सूचना दिल्या आहेत परंतु बऱ्याच गरीब शेतकऱ्यांकडे मोबाईल नसल्याकारणाने त्यांनाही पीक पाहनी करण्यास खूप मोठे अडथळे येत आहेत तसेच ज्या काही सामान्य अशिक्षित शेतकऱ्यांकडे मोबाईल आहेत परंतु त्यांना ऑनलाईन पीक पाहणी पिक पेरा हे व्यवस्थित रित्या भरता येत नाही अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत असून शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढलेली आहे ते एकमेकांना विचारणा करत आहेत की ई पिक पाहणी कसे करायचे ऑनलाइन प्रक्रिया असल्यामुळे शेतकरी काही चूक होईल का त्यामुळे घाबरत आहेत तसेच त्यांना संदर्भात माहिती नसल्याने त्यांनाही पिक पाहण्याची माहिती देणे अतिशय महत्त्वाचे आहे इ पीक पाहनीची मुदत वाढ ही 25 सप्टेंबर पर्यंत झालेली असून प्रत्येक गावात संबंधित खात्याच्या व्यक्तीकडून ई पिक पाहण्याची माहिती देऊन सर्व शेतकऱ्यांना ई पिक पेरा कसा भरायचा हे सांगावे व सर्व शेतकऱ्यांची पीक पाणी कन्फर्म झाल्याचे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती करून घेऊन येणाऱ्या तारखेपर्यंत शंभर टक्के ई पीक पाहनी पूर्ण केल्या असल्याचे खात्री करून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुस्कानापासून वाचवावे बऱ्याच शेतकऱ्यांना ई पीक पाहनी याबद्दल माहिती नाही तसेच त्यांना ऑनलाईनई पीक पाहनी फॉर्म भरता येत नाही काहींना तर हे फॉर्म भरते वेळी अनेक समस्या येतात कधी चार अंकी संकेतांक मिळत नाही तर कधी फॉर्म पूर्ण झाल्यानंतर सबमिट करतेवेळी पूर्णपणे भरलेली माहिती निघून जाते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना सुद्धा चिंता आहे की आपले फॉर्म भरल्या गेलेत की नाही शेगाव तालुक्यात चाळीस ते पन्नास गावे आहेत परंतु संबंधित महसूल विभागाकडून चार ते पाच गावांमध्येच कॅम्प घेण्यात आले आणि इतर गावांमध्ये कॅम्प न लावल्यामुळे त्यांना माहिती नसल्यामुळे ई पिक पाहणी करताना अडथळे निर्माण होत आहेत करिता संबंधित विभागाने प्रत्येक गावात इ पीक पाहनीचे कॅम्प घेऊन शेतकऱ्यांना मदत करावे अन्यथा ई पीक पाहणी पासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना जबाबदार संबंधित अधिकारी व शासन राहील अशी सामान्य शेतकऱ्याची शासनाकडे ओरड आहे”यावर्षी अनियमित निसर्गामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झालेली आहे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे अशातच शासनाकडून मिळणाऱ्या लाभासाठी ई पीक पाहनी अत्यंत महत्त्वाचे आहे जर ए पीक पाहणी पासून काही शेतकरी वंचित राहिल्यास आणि त्यांच्याकडून काही अनैतिक कृत्य जसे आत्महत्या सारखे घडल्यास याला जबाबदार संबंधित अधिकारी व शासन राहतील करिता शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येक गावात ई पीक पाहनी ची माहिती देऊन तसेच तेथीलपीक पेरा शंभर टक्के पूर्ण झाल्याचे खात्री तारीख संपण्या अगोदर करून घ्यावी “शेतकरी भारत भाऊ कंकाळ मनसगाव शेतकरी राजू पाटील शेळके भोनगाव



