विदर्भ

घरगुती भांडणामुळे मुलानेच केले आईला जखमी

घरगुती भांडणामुळे मुलानेच केले आईला जखमी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव । घरघुती भांडणात मुलाने आईच्या हातावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना दसरानगर येथे १४ सप्टेंबर रोजी घडली.

फिर्यादी छाया बळीराम बघे (४५) रा. दसरानगर शेगाव यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुमारास फिर्यादीचा मोठा मुलगा पवन याने तु या घरात राहु नको, हे माझे वडीलांचे घर आहे, असे म्हणून घराचे बाहेर काढून दिले. तेव्हा फिर्यादीने त्यास घरातील मोबाईल, पैसे व कपाटाची चाबी घेऊ दे असे म्हटले असता पवन याने फिर्यादीचे डाव्या हातावर चाकूने मारून जखमी केले व जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. अशा रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम ३२४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोहेकॉ विनायक सरोदे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button