गुन्हेगारीबुलढाणा

खळबळजनक : हॉटेलच्या गल्ल्यावर हात साफ करणारी तरुणी कॅमेऱ्यात कैद

जने बस स्थानक परिसरात असलेल्या हॉटेल तुषार मध्ये चोरी, ; ५० हजार लंपास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव येथील जुन्या बस महिलाही सक्रिय होत असल्याने समाज कोणत्या दिशेने चालला, आज १४ सप्टेंबर रोजी पहाटे याची प्रचिती या घटनेवरून येते.

स्थानकावरील हॉटेल तुषार येथे ५.३० वाजता सुमारास चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. सदर चोरीची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सदर चोरी एका तरूणीने केल्याचे दिसत आहे व तिला भंगार विक्रीच्या गाडीवाल्याने सहकार्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे आता या क्षेत्रात

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चित्रणानुसार हॉटेल तुषार अॅन्ड बारमध्ये अंदाजे १५ ते १६ वर्षीय तरूणीची एन्ट्री होते. ती इकडे तिकडे कोणी आहे का? याची पडताडणी करते व नंतर हॉटेलचा गल्ला उघडून त्यामधून काहीतरी उचलते व हॉटेलमधून बाहेर पडते. नेमके त्याचवेळी हॉटेलच्या बाहेर

एक भंगारवाला पायडल रिक्षा घेऊन उभा असतो. त्याचेसोबत एक महिलाही असल्याचे दिसते. ही घटना आज पहाटे ५.३० वाजता सुमाराची आहे. याबाबत हॉटेल मालकांनी सांगितले की, त्यांच्या हॉटेलचे शटर उघडून तरूणी आत शिरली व तिने गल्ला उघडून त्यामधील ५० हजार रूपये चोरून नेले. या घटनेबाबत पोलिसांत रिपोर्ट देणार असल्याची माहिती हॉटेल मालक सुळ यांनी दिली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button