एमसीएन न्यूज उत्कृष्ठ पत्रकार शेगाव पुरस्काराचे मानकरी ठरले रवी शेगोकार

माजी मंत्री आमदार संजय कुटे यांच्या मार्फत उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित रवी शेगोकार यांचा सत्कार
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शेगाव सर्वसामान्यांचे प्रश्न सातत्याने मांडणारे एक प्रबळ पत्रकार मनून रवी शेगोकार ओळखले जातात. हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाप्रती न्याय देण्याचे काम त्यांनी केल आहे. आपल्या लेखणीने भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे घोटाळे त्यांनी सातत्याने सामोरे आणलेले आहेत. याचीच दखल घेऊन एम सी न्यूज च्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जामोद येथे माजी मंत्री तथा जळगाव मतदार संघातील लोकप्रिय आमदार कुटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना एमसीएन न्यूज शेगाव २०२३ चा उत्कृष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.लोकशाहीत माध्यमांचं मोठं महत्व असतं. त्यामुळं ही माध्यमं टिकली पाहिजेत, त्यांच्या संवर्धनासाठी निर्भेळ वातावरण असण्याची गरज आहे. पत्रकारिता हा काही प्रामुख्यानं पैसा कमावण्याचा, नफा कमावण्याचा धंदा नसतो, असंही सांगितलं जातं. माध्यमांचं काम सकळजनांना शहाणं करणं असलं पाहिजे, माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचं व्रत सोडू नये अशीही अपेक्षा असते. पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे, त्यावर तटस्थ भाष्य करुन दिशा देणंही अपेक्षित असतं. असे प्रतिपादन आमदार संजय कुटे यांनी केले.
कोड –पत्रकार रवी शेगोकार जिल्हा प्रतिनिधी
पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सद्सत् विवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत, बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं, असंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावं. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्राचं नावं ‘मूकनायक’ ठेवलं होतं.



