बुलढाणामहाराष्ट्र
कल्पना हॉटेल येथील वीजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

कल्पना हॉटेल येथील वीजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर
शेगाव । वीजेचा शॉक लागून एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी पहाटे २.१५ वा. पुर्वी घडली.
या घटनेसंदर्भात स्थानिक सईबाई मोटे रूग्णालयाचे कक्षसेवक कैलास दत्तु घाटे यांनी डॉ. मयुर यांचे सहिचा मेमो शहर पो.स्टे.ला सादर केला. त्यानुसार मृतक नामे ज्ञानेश्वर बाळकृष्ण निकम वय २३ वर्षे, रा. जलंब ता. शेगाव याला ८ सप्टेंबर रोजी पहाटे २.१५ वाजता सुमारास शहरातील हॉटेल कल्पना येथे वीजेचा शॉक लागल्यामुळे मृतावस्थेत सईबाई मोटे रूग्णालयात आणण्यात आले होते. वैद्यकीय रिपोर्टवरून पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला असून घटनेचा तपास सहा फौजदार गजानन गावंडे हे करित आहेत.



