महाराष्ट्रसामाजिक

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे सन 2023- 24 या वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला व मुलींसाठी लाभाच्या योजना राबविण्यात येते. असे आवाहन करण्यात आले आहे.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

योजनांच्या लागामुळे ग्रामीण भागातील महिला आणि मुली यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावतो. तसेच त्यांना वैयक्तिक कमाईचे साधन मिळते. मागील ५ वर्षात लाभ घेतला नसल्यास लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत. एका योजनेसाठी एका लाभार्थ्यास एकच अर्ज सादर करता येणार आहे. या लाभासाठी चार योजना आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना पिठाची चक्की घेण्यासाठी 90% अनुदान, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला व मुलींना शिलाई मशीन घेण्यासाठी 90 टक्के अनुदान, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मिनी दाल मिल घेण्यासाठी 90 टक्के अनुदान, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मसाला उद्योग मशीन घेण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. सदर योजनांचे अर्ज आणि संबंधित अटी व शर्ती तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण, तसेच बेबसाईटवर उपलब्ध आहे. तालुकास्तरावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात 29 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आव्हान महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद बंडोले यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button