बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
शिवसेना ऊ बा ठा पक्ष व महिला देवठाना खांबच्या वतीने दारूबंदी साठी निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव – : मालेगाव आज दि ८/९/२०२३ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महिला देवठाना खांबच्या वतीने दारूबंदी साठी निवेदन देण्यात आले कारण गावा मध्ये दारू मुळे अशांतता तयार होत असून व्यसनापाइ नवीन तरुण पिढी बरबाद होत आहे महिला दिवस भर काम करून आल्या नंतर घरी पती दारू पिऊन भांडणाचे प्रकार वाढले आहेत हे प्रकार त्वरीत बंद न केल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो तरी निवेदनाची दखल घेऊन कडक कार्यवाही करावी. निवेदन देण्यासाठी गावातील शेकडो महिला व पुरुष तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते



