बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

बुलढाणा 13 सप्टेंबरला घोंगावणार मराठा क्रांती मोर्चाचे वादळ! मार्ग व सभा स्थळ निश्चित! जिल्हा मुख्यालय भगवेमय! शाळकरी मुली करणार नेतृत्व..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

मराठा आरक्षण आणि जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध बुलढाणा जिल्ह्यातील मराठा समाज बांधव नोंदविणार आहे. यासाठी बुलढाणा येथे 13 सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा निघत आहे. प्रशासनासोबत दीर्घ चर्चे अंती मोर्चाचा मार्ग, सभा स्थळ ड्रेस कोड, पार्किंग व्यवस्था, पाण्याचे नियोजन अधिनियम पार पाडले असून जिल्ह्याच्या तेराही तालुक्यातून मोर्चेकरी बुलढाणा जिल्हा मुख्यालयी येणार असल्याने प्रशासनाची दाब वाढली आहे. प्रशासन व सम न्वयकांच्या बैठकीत मोर्चाला अंतिम रूप आज देण्यात आले .
मराठा समाजात आर्थिक दुर्बलतेचे प्रमाण अधिक असल्याने मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा अलीकडे पुढे आला आहे. यासाठी यापूर्वीही प्रचंड मोर्चे राज्यभर निघाले. हीच मागणी आजही कायम असल्याने मराठा आरक्षणाची तीव्रता शासन प्रशासनाच्या निर्देशास आणून देणे व जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा येथे 13 सप्टेंबर रोजी भव्य मराठा मोर्चाचे आयोजन आहे. जिजामाता प्रेक्षागर या ठिकाणी मोर्चा करीजमणार आहे. शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा मार्ग क्रमण करेल. संगम चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना सामूहिक अभिवादन करून जस्तंचोक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक…. असा रूट निर्धारित करण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button