बुलढाणामहाराष्ट्रविदर्भशैक्षणिक

जिल्हा परिषद शाळा उकळी बु. ता.संग्रामपूर येथे संविधान जागृती (BS4) मोहीमेचे आयोजन

*जिल्हा परिषद शाळा उकळी बु. ता.संग्रामपूर येथे संविधान जागृती (BS4) मोहीमेचे आयोजन

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी- श्याम पहुरकरसंग्रामपूर तालुक्यातील उकळी बु. येथील जिल्हा परिषद शाळा . येथील शुक्रवार दि 8 सप्टेंबर 2023 रोजी वेळ सायंकाळी 5:30 वाजता संविधान जागृती (BS4 )मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. महामानवाकडून समस्त शेतकरी ,कष्टकरी भारतीयांच्या समग्र उत्कर्षाकरिता लिहिल्या गेलेल्या भारतीय संविधानाचा सन्मान करण्यासाठी तथा संविधानाची सुरक्षा करण्यासाठी समस्त नागरिकांची जागृती होण्याकरिता या संविधान जागृती (BS4) मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहेतसेच*”संविधान केवल वकिलो का दस्तावेज नही है,यह जीवन का वाहन है! इसकी आत्मा हमेशा युग की भावना है!*-डॉ. बाबासाहेब अंबेडकर” यांच्या या विचाराचे महत्व स्पष्ट करण्यासाठी तथा संविधानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी काही संविधान अभ्यासकांना प्राचारण केलेले आहे ते आपणास संविधानाची महती तथा संविधान हे आपल्या भविष्याचा आणि अधिकाराचा कसा लेखाजोखा आहे ते या मोहिम अंतर्गत समजावून सांगणार आहेत या मोहिममध्ये मा.श्री.भीमराव परघरमोल व मा.श्री राजेश नृपनारायण सर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत त्याचा लाभ घेण्याकरिता समस्त बहुजन समाजातील समस्त नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच उकळी गावासह शेजारील गावकरी मंडळींना सुद्धा उपस्थित राहण्याकरिता याद्वारे विनम्र आवाहन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी उकळी बु यांनी केले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button