वन बुलढाणा मशीनच्या सप्तऋषी दुचाकी रॅलीत अध्यात्माचा गजर! रॅलीत 400 हून अधिक दुचाकी स्वरांचा सहभाग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
वन बुलढाणा मिशनच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी सप्तऋषी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या संकल्प नेतून ही रॅली काढण्यात आली. रॅली ४00 हून अधिक दुचाकी स्वरांनी सहभाग नोंदवला. या दुचाकी रॅलीत विकास आणि अध्यात्माचा गजर करण्यात आला.
सकाळी नऊ वाजता चिखली तालुक्यातील उदयनगर येथून दुचाकी रॅली प्रारंभ झाला. तोरण वाडा .असोला नाईक, दुसरा नाईक, किनी ,नाईक ,वडाळी, मोहना ,परारखेड, पाथर्डी, वरवंड, गोमेधर, उटी मार्गे जानेफळ रॅलीचा समारोप झाला. रॅलीत सहभागी दुचाकी स्वरांमध्ये भरभरून उत्साह बघायला मिळाला. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी सप्तऋषीच्या दर्शनाला विशेष महत्त्व असते. या अनुषंगाने वन बुलढाणा मिशन तर्फे दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅली दरम्यान गावोगावी संदीप शेळके यांच्यासह सहभागी दुचाकी स्वरांचे स्वागत करण्यात आले. माता, भगिनींनी औषण केले. निसर्ग रम्य वातावरण आणि डोंगराळ भागात सप्तऋषी चे ठिकाण आहेत. यार अली दरम्यान सोमवारी पाच ऋषीचे दर्शन घेण्यात आले.



