जळगावा जिल्हाबुलढाणा

महाविकास आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन

महाविकास आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

शेगाव ::छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात महाविकास आघाडी मधील तीनही घटक पक्षातर्फे मराठा आरक्षण आंदोलन दडपण्याच्या निषेधार्थ आज 3 सप्टेंबर रविवारी रास्ता रोको करण्यात आला .
मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यासाठी शांततेच्या मार्गाने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात आंदोलन सुरू होते. सदर आंदोलन पोलीसी बळाचा वापर करून दडपण्याचे काम या जुलमी राज्य सरकारने केले. आंदोलनाकांवर पोलीसांनी अमानुष असा लाठीचार्ज करून गोळीबार केला. यात शेकडो स्त्री पुरुष जखमी झाले. या जुलमी व हुकूमशाहीचे प्रतीक असणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ आज रविवार ३ सप्टेंबर २०२३ ला सकाळी १०:३० वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगांव येथे ‘महाविकास आघाडीच्या वतिने रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाहतूक ठप्प झाली होती या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव राम विजय बुरुंगले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, दत्ता पाटील ,गजानन हाडोळे काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कैलास बापू देशमुख माझी नगराध्यक्ष शैलेंद्र दादा पाटील , शहराध्यक्ष किरणबाप्पू ज्ञानेश्वर शेजोळे, डॉक्टर जयंतराव खेडकर, हाशिम भाई काँग्रेस अल्पसंख्याक आघाडी उपाध्यक्ष जब्बार ठेकेदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिनेश साळुंखे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष योगेश पल्हाडे माजी नगरसेवक आशिष गंगणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील उमाळे ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीधर दादा पाटील काँग्रेसचे पदाधिकारी केशव हिंगणे गुडन जमदार दिलीप पटोकार अनिल साबळे काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता राजवैद्य स्नेहलता दाभाडे माजी शहराध्यक्ष सविता झाडोकार सर्व | पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलनात सहभाग घेतला होता

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button