ग्रामसचिवाकडून माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळा

*ग्रामसचिवाकडून माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळा
स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस शेगाव प्रतिनिधी
श्याम पहुरकर

शेगाव तालुक्यातील खातखेड येथील पंचायत समिती शेगाव अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत खातखेड येथे धनंजय संजय देवचे राहणार खातखेड यांनी 30/6/23 रोजी कायदेशीर रित्या माहिती अधिकारात माहिती मागितली होती परंतु माहिती अधिकारी तथा सचिव गट ग्रामपंचायत खातखेड यांनी दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला असून सुद्धा माहिती अधिकारात माहिती मागणाऱ्या व्यक्तीला कुठल्याच प्रकारची माहिती दिलेली नाही मी मोजे खातखेळ येथील काय रहिवासी असून माझ्या मालकी व ताब्यातील मौजे खातखेडा येथील शेत गट क्रमांक 22 क्षेत्रफळ 44.77हे आर (पो. ख.0.70आर ) शेत जमीन आहे सादर शेती माझ्या नावाने ऑनलाईन सातबारा रेकॉर्डवर सुद्धा नोंदविलेले आहेत परंतु ग्रामपंचायत येथील ग्रामसचिव श्री दिनेश बाजोडे यांनी खोटे व बनावट कागदपत्रांच्या आधारे. अवैधरित्या वरील वर्णाच्या शेतीची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये नमुना आठ वर अरुण श्रीराम कोकाटे व इतर यांच्या नावाने घेण्यात आलेल्या आहेत अशा परिस्थितीत ग्राम सचिव श्री दिनेश बाजोडे यांनी मनमानी कारभार चालविलेल्या असून कायदेशीररीत्या अधिकाराचा वापर करून सचिव पदाचा अनधिकृत कामे करण्यासाठी वापर केलेला आहे.पंचायत समितीचे अधिकारी इंगोले साहेब यांच्या जवळ आज दिनांक 31 8 2023 रोजी गेलो असताना त्यांनी दहा दिवसांच्या वेळ मागितला असे उडवा उडवी चे उत्तर दिले




