खानदेशजळगावा जिल्हा

महावितरणच्या गलथान कारभारामुळे नायगाव येथील शेतकरी त्रस्त प्रमोद सौंदळे यांचा आंदोलनाचा इशारा:-

गेल्या कित्येक दिवसापासून धाबे शिवारातील नींबू डीपी पासून ते जवळपास 13 ते 14 विद्युत खांबांवरील शेती विज पंपांना वीज पुरवठा होणाऱ्या तारांची चोरी झालेली आहे त्यामुळे वीजपुरवठा खंडित झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात तसेच जळगाव जिल्ह्यात आणि मुक्ताईनगर तालुका सुद्धा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे हे सर्वश्रुत आहे जेमतेम शेतकऱ्यांकडे पाण्याचे साधन असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके कशीतरी अद्याप जगवलेली आहे वरून राजा च्या वक्र दृष्टीने पिके कोमेजून वाळण्यास सुरुवात होत आहे पिकांना अत्यावश्यक पाण्याची गरज असल्यामुळे शेतकरी चिंता तूर झालेले आहेत वेळोवेळी शेतकऱ्यांनी विद्युत महावितरण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन द्वारे तसेच याबद्दल लेखी तक्रारी दिलेल्या आहेत परंतु विद्युत महावितरण चे अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे जर तात्काळ तारांची जोडणी करून विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही तर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन मुक्ती पार्टी राज्य संघटक प्रमोद सौंदळे यांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिलेला आहे. निवेदन देतेवेळी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर, एन एन टी एम कार्याध्यक्ष देवलाल तांबे ,वैभव पाटील ,अशोक पाटील ,सदाशिव सौंदळे ,बळीराम पाटील, रामराव पाटील. आणि शेतकरी बांधव उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button