अपुरा पाणीपुरवठा, खड्डड्यांनी वसई-विरारचे नागरिक हैराणमहापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

बाळू साळवे
मुंबई बीरो चीप
३१ ऑगस्ट २०२३ गुरुवार
विरार : वसई विरार शहरातील खड्डेमय रस्ते तसेच पावसाळ्यातही नागरिकांना – होणारा अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याच अनुषंगाने पालिकेच्या मुख्यालयाच्या दालनात मंगळवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी दीड तास ठिय्या आंदोलन केले.
वसई-विरार शहरातील तसेच महामार्गावर पडलेले खड्डे पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात बुजवले होते, मात्र ते खड्डे पुन्हा जैसे थे अवस्थेत आहेत. याकडे पालिका कानाडोळा करत असल्याचा आरोप करण्यात आला.
ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार?
दीड तास आयुक्तांच्या केबिनबाहेर बसून केलेल्या ठिय्या आंदोलनाची आयुक्तांनी दखल घेतली आणि जे वॉल मन पाणी सोडण्यासाठी पैसे घेतात. निकृष्ठ रस्त्याची काम
करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले, अशी माहिती मयुरेश वाघ आणि सुदेश चौधरी यानी दिली.




