Uncategorizedमहाराष्ट्र

मुक्ताईनगर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर एन. जी .मराठे यांच्या कन्याडॉ. निकिता मराठे एम एस जनरल सर्जन प्राविण्याने उत्तीर्ण मुक्ताईनगर तालुका वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा :- ( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे )

मुक्ताईनगर येथील सुप्रसिद्ध नाक कान घसा तसेच हृदयरोग तज्ञ डॉक्टर एन जी मराठे यांची लहान कन्या डॉ. निकिता नारायणराव मराठे यांनी वैद्यकशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमात एम. एस.(जनरल सर्जन) या अभ्यास क्रमात विशेष प्रविण्याने उत्तीर्ण होण्याचे यश संपादन केले आहे. रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महात्मा गांधी मिशन कॅम्पस येथे पार पडलेल्या पदवीदान समारंभात त्यांना एमएस जनरल सर्जन या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, कुलपती कामलकिशोर कदम उपस्थित होते.
डॉ. निकिता मराठे या मुक्ताईनगर येथील ह्रदयरोग तज्ञ डॉ.एन. जी.मराठे यांच्या कन्या आहेत. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री मराठे (एमबीबीएस) यांच्या भगिनी आहेत. मराठे कुटुंबाचे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदनआहे.त्यांच्या मुलगा यश मराठे एम बी बी एस करीत आहे. जवाई राहुल जाधव (एमबीबीएस)वैद्यकीय अधिकारी तर आहेत. कुटुंबातील वैद्यकीय भरारीत डॉ. एन जी मराठे व त्यांच्या पत्नी सुनंदा मराठे यांचे मोठे योगदान आहे. डॉक्टर निकिता मराठे यांच्यावर तालुक्याभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button