मैत्रीची छायाचित्रे प्रसारित केल्याने डोंबिवलीत महिलेची आत्महत्या.

मैत्रीची छायाचित्रे प्रसारित केल्याने डोंबिवलीत महिलेची आत्महत्या.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर एकाच गावातील निवास असल्याने झालेल्या मैत्रीमधून एका तरुणाने एका महिलेबरोबर मोबाईलमधून छायाचित्रे काढली होती. या छायाचित्रांचा आधार घेऊन आरोपी तरुण महिलेला छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन सारखे पैसे मागत होता. या सततच्या छळाला कंटाळून महिलेने डोंबिवलीतील देसलेपाडा येथील आपल्या राहत्या घराच्या सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
गेल्या महिन्यात हा प्रकार घडला आहे. मृत महिला ही कष्टकरी घरातील आहे. मजुरीसाठी ती आपल्या कुटुंबासह हरयाणा राज्यातील कैथल जिल्ह्यातील डोंगर पट्टी गावातून डोंबिवलीत आली. ही महिला आपल्या कुटुंबासह डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा नवनीतनगर येथील रविकिरण सोसायटीत राहत होती. अजय ऋषीपाल (३३) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी सांगितले, आरोपी अजय आणि मृच महिला हे हरियाणामधील एकाच गावामधील रहिवासी आहेत. त्यांच्यामध्ये मैत्री झाली होती. या मैत्रीतून आरोपी तरुणाने महिलेबरोबर मे महिन्यात मोबाईलमधून छायाचित्रे काढली होती.



