महाराष्ट्र

जिल्ह्यातील सहा पत्रकारांचा समाज सेवा गौरव पुरस्कार, दर्पण पत्रकार व संपादक फाऊंडेशन या संस्थेद्वारे सन्मान

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

शेगाव:- नागपूर येथील पत्रकारांसाठी झटणारी संघटना म्हणून ओळख असणारी दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशन नागपुर द्वारा जिल्ह्यातील सहा पत्रकारांना समाज सेवा गौरव पुरस्काराने शेगाव येथील स्थानिक विश्रामगृह येथे एका समारंभात सन्मान करण्यात आला….
दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशन ही संघटना पत्रकारांच्या हितासाठी निरंतर काम करत आहे …
पेन्शन योजना, इन्शुरन्स, आवास योजना, पत्रकार भवन, पत्रकारांची सुरक्षा चे कायदे या प्रकारच्या मागण्याचा पाठपुरावा करत असते. तसेच वृक्षारोपण,ब्लड डोनेशन कॅम्प, दीव्यांगा साठी कृत्रिम हाथ पाय उपलब्ध करून देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून होते.आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी विश्रामगृह शेगाव येथे एका कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील निर्भीड,विशिष्ट व समाजासाठी काम करणाऱ्या सहा पत्रकारांचा समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित आला. प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील राजेंद्र काळे जिल्हा प्रतिनिधी देशोन्नती, सदानंद शिरसाट हॅलो हेड प्रमुख दैनिक लोकमत, धनराज ससाने क्राईम रिपोर्टर, मयूर निकम जिल्हा प्रतिनिधी झी 24 तास, कृष्णा सपकाळ समूह सल्लागार बुलढाणा लाईव्ह, ज्ञानेश्वर ताकोते पाटील विशेष प्रतिनिधी बुलढाणा लाईव्ह व तालुका प्रतिनिधी दैनिक महाभुमी, यांचा समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला, तसेच जिल्ह्यातील समाजसेविका सौ ज्योती बावस्कर सौ रंजना चव्हाण सौ जयश्री देशमुख शिवाजीराव जाधव सौ शुद्धमती निखाडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला…..
यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती मायाताई दामोदर, पतंजली ग्रामोद्योग न्यास हरिद्वार चे महेश दिपके, महानगरपालिका गटनेता राजेश मिश्रा,संस्थापक अध्यक्ष सुशील पांडे, राष्ट्रीय सचिव संजय तिवारी, राजेंद्र पाठक मुख्य संपादक पोलीस टाइम्स 24, राजेश शुक्ला राष्ट्रीय उपाध्यक्ष दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशन नागपूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष अकोला उषाताई वाकोळे, क्षेत्रीय मराठा फाउंडेशनचे अमित गुंजकर, शेगाव येथील पत्रकार राजेश चौधरी, पत्रकार अनिल उंबरकर, पत्रकार बबलू देशमुख, पत्रकार सचिन बहुरूपी इत्यादींची उपस्थिती होती….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button