शेगाव येथे लक्ष्मीनगर मध्ये चोरी

शेगाव येथे लक्ष्मीनगर मध्ये चोरी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव स्थानिक लक्ष्मीनगरमध्ये एका घरी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरामधी बेडरूमच्या अलमारीतून 1 ३ लाख नगदी व ४० हजार रूपयांचे दागिने असा एकूण ३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान घडली.
याबाबत अंकित रामदास चौथनकर (२६) रा. धामणगाव बढ़े ह.मु.लक्ष्मीनगर शेगाव, व्यवसाय नोकरी यांनी शहर पोस्टेला फिर्याद दिली की, ते परिवारासोबत बाहेरावी असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या जिन्याजवळील दरवाज्याचा कडीकोडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील आलमारीतील लॉकरमध्ये ठेवलेले नगदी ३ लाख रूपये व ४० हजार २५५ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ४० हजार २५५ रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला, याप्रकरणी पोलिसांनी कलम ४५४, ४५७, २८० भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय कातकाडे करीत आहेत



