महाराष्ट्रमुबई

जळगांव जात पडताळणी समितीचा अजब कारभार जळगाव

जळगांव जात पडताळणी समितीचा अजब कारभार जळगाव – जळगाव जिल्हा जात पडताळणी समितीकडे विद्यार्थ्यांचे अनेक वर्ष व महिन्यांपासून राजपुत भामटा जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी दाखल केलेले असुन, 1961 पुर्वीचे पुरावे, रक्त नात्यातली दक्षता, मुद्दाम त्रुटी काढण्यात येत असुन विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, जळगाव जिल्हा जात पडताळणी समितीकडे विद्यार्थ्यांचे अनेक वर्ष व महिन्यांपासून राजपुत भामटा जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी दाखल केलेले असुन विद्यार्थ्यांना जात पडताळणी समिती कार्यालयातुन मिळत नाहीत परंतु एजंट लोकांनकडूनच जात पडताळणी प्रमाणपत्र 3 ते 4 दिवसातच कसे मिळते अशी सूत्रांकडून कळते, याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकरणांची पालकांकडे पुरावे असुन बरीचशी पालक चौकशी वेळी सादर करतीलच, परंतु चौकशी झालीच पाहिजे, गेल्या 4 वर्षी पासुन पालक व विद्यार्थी या कार्यालयात खेट्या घालत असुन संबंधीत कार्यालयाकडून समितीचे कामकाज कधी असते ते देखील पालकांना किंवा विद्यार्थ्यांना कळविले जात नाही. मागील वर्षी सादर केलेले पडताळणीसाठीचे किती प्रकरणे जमा झाली व किती निकाली निघाली, व किती विद्यार्थ्यांना पडताळणी प्रमाणपत्र का मिळाली नाहीत याची चौकशी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांनाच्या रक्तच्या नात्यातील जात पडताळणी प्रमाणपत्र, महसुली पुरावे देखील सादर केलेल्या तारखेनुसार कोणाला किती दिवसात पडताळणी करून दिली व ज्याची पडताळणी झाली व नाही झाली त्याचे कारण आणि पडताळणी प्रमाणपत्र दिले त्यांच्या पैकी किती लोकांची दक्षता केलेली आहे किंवा नाही याची चौकशी झाली पाहिजे, आणि कुणाला किती दिवसात पडताळणी करून दिली हे देखील समोर आले पाहिजे ,मागील 22-23 या वर्षी 12 वीत शिकत असलेल्या विद्यार्थीनी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी कार्यालयात on line सादर केलेले असुन आता प्रवेशासाठी CET सेल ने 24/08/2023 शेवटची मुदत दिली असुन या तारखे पर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न झाल्यास प्रवेश प्रकियातून त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले जाणार असुन विद्यार्थ्यांनचे नुकसान होणार आहे, वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास प्रवेश प्रक्रियातून बाहेर काढले जातील व विद्यार्थ्यांना नुकसान होईल,यामुळे विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक नुकसान होणार आहे याला जबाबदार कोण ? येणाऱ्या 26-08-2023 रोजी. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने पालकांनी भेट घेऊन निवेदन देऊन चौकशी करण्यासाठीची विनंती करण्यात येणार असल्याचे कळते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button