बुलढाणामहाराष्ट्र

महीलांचे अन्याय कमी करन्यासाठी भाजपा पुढे

*महीलांचे अन्याय कमी करन्यासाठी भाजपा पुढे* स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेजननी ही वंशज झाली पाहीजे !हा देश मॉ जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाईचा आणि सावित्रीबाईचा. या देशात आता सर्व स्रियावरील अन्याय हा भरपूर प्रमाणात कमी झाला. स्त्री पुरुष समानता आलेली आहे. सणाला स्त्री बाहेर ऑफिसमध्ये जाते अन पुरुष घरात स्वयंपाक करतात. आता मुलीचे वय देखील मुलाच्या वयाच्या जास्त आहे प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाबरोबरीने काम करत आहे. पण अजून एका महत्वाचा बदल हिंद ही काळाची व जगाची गरज आहे. ती म्हजे स्त्री ही वंशज झाली पाहिजे. मुलगा हा पण मुलीकडे आला पाहिजे मुलाचे ही आडनाव बदलले पाहिजे. असा हा बदल देखील स्त्री पुरुष समानता घेऊन येईल, मुलगी पण आई-वडीलांचा आधार होईल. आजही ज्यांना 3 किंवा 4 वा त्यापेक्षा अधिक मुली आहेत त्यांना हा प्रश्न पडतो की आपली संपत्ती कोणाला द्यावी. मुलीला दिली तरी ती जावयाला जाणार त्यांच्यामुळे आपला तर वंश वाढणार नाही. त्यामुळं हा बदल होणं काळाची गरज आहे तो म्हणजे स्त्री ही वंशज झाली पाहीजे. यामुळे किती तरी प्रश्न सुटतील हा बदल झाला तर 1. मुलगी झाली म्हणून कोणी रडणार नाही. 2. मुलासाठी कोणी 3 किंवा 4 मुली होऊ देणार नाही. 3.आई वडीलांना मुलीचा ही आधार मिळेल. 4 सासू सुनेमध्ये वाद होणार नाही. 5. ज्यांना मुलंच आहे त्यांना मुलगी नसल्याची खंत राहणार नाही 7. मुलीचे बालसंगोपन मुलासारखे होईल 8. स्त्री वर अन्याय होणार नाही. 9. आई वडिलांचा वारसा मुलीला मिळेल. 10. ज्या प्रमाणे मुलीच्या मागे वडिलांचे नाव आहे तसे आई चे नाव राहील. हा कायदा एक मोठा बदल घडून आणेल आणि सर्वांच्याच फायद्याचा असेल आणि खऱ्या अर्थाने स्त्रीला न्याय मिळेल सरकार महिला मंडळ सर्वांनी ह्या कडे लक्ष केंद्रीत करावे. कारण कुठलाही बदल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलीची शाळा काढली म्हणूनच आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरुषां बरोबरीने आहे. नाहीतर आज ही स्त्री चूल आणि मुलं ह्यातच गुंतलेली राहिली असती. आज स्त्री नोकरी जरी करत असली तरी आई-वडिलांना सोडून. तिला सासरी जावंच लागत एकुलती एक मुलगी असली तरी ती आई वडिलांचा आधार बनू शकत नाही, म्हणूनच मुलगी ही पण वंशज व्हायला हवी. हा एक बदल सर्व प्रश्न सोडवेल. ज्या मुलांना असं वाटते मुलींना दोन्ही घरचे प्रेम मिळते तस आम्हाला ही हवं होत ते मुलं सासरी जायला तयार ही होतील. ज्यांना एकच मुलगी असेल त्या आई- वडिलांचे घर पण भरून राहील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता येईल. आज आपण बऱ्याच वेळेस म्हणतो मुला-मुलीत भेदभाव राहिला नाही. मुलगी पण आपला मुलगाच आहे. पण मुलीचे लग्न करून तिला सासरी पाठवावेच लागते ना. मग कसला भेदभाव नाही ? जोपर्यंत मुलगीपण वंशज होत नाही. तोपर्यंत हा भेदभाव राहील म्हूणन सरकारने ज्याप्रमाणे स्त्रीयांसाठी बाकीचे कायदे काढलेत त्याप्रमाणे स्त्रीयांसाठी हा कायदा पण काढावा. दोनच अपत्य हवे नाही तर सरकारी नोकरीं मिळत नाही. पण ज्या व्यक्तीला दोन मुलीच आहे. त्यांचा वंश कसा वाढेल याचापण विचार सरकारने करायला हवा ना आणि म्हूणनच मुलीला देखील वंशज करण्याचा हा एका कायदा स्त्रीयांचे अख्ख़ आयुष्य़ बदलवून टाकेल. त्यांच्यावरचे सर्व अन्याय दूर होतील. मुलीच आहेत म्हूणन कोणतेही आई वडील नाराज होणार नाहीत, मुलगीच आहे म्हूणन सुनेला कुणी दोष देणार नाही आणि म्हणूनच मुलगी ही देखील वंशज व्हायला हवीमुलासाठी कुठे कुणाला 9 मुली नंतर मुलगा आहे तर कुठे 7 मुलगी नंतर मुलगा आहे ! कशासाठी ? एवढ्या मुली. तर फक्त़ आणि फक्त् मुलासाठी. कारण मुलगाच हा वंशाच दिवा आहे. “आई मी झाली म्हूणन तू नाराज नको ग होऊ, मीच तुझा मुलगा आहे, मी देखील मुलासारखा सांभाळ करील,” ह्या त्या निरागस मुलीच्या भावना असतील तर तिला साथ द्यायला हवी ना. मुलीला देखील वंशज व्हायची संधी द्यायला हवी ना. आजही ज्यांना मुलीच आहेत त्या प्रत्येक चिमुकली च्या मनाची ही अवस्था आहे. त्या वेळेस त्या आई जवळ कुठेलेच उत्तर नसते. कारण जगाची रीत आहे न मुलगा च वंशज मग ती रीत बदलायला हवी न स्त्री पुरुष समानता यायला हवी न ! त्या निरागस मुलीचे मन जाणायला हवं ना आणि जपायला ही हव.मुलगी जन्माला आली म्हणजे पापच समजल्या जाते ना. काय दोष आहे हो त्या आई-वडिलांचा की दोष मुलीचा . प्रत्येक मुलीचे लग्न करताना काय अवस्था होते हो त्या आई वडिलांची. जरा विचार करायला हवा. लहान पणापासून सांभाळ करावा लागतो. नंतर लग्न कराव लागत. प्रत्येक सण मोठया थाटात करावे लागतात आणि शेवटी त्या वडिलांचा मुली वर काहीच अधिकार राहत नाही. मुलगी ही आधार बनू शकत नाही. म्हूणनच मुलगी ही वंशज व्हायला हवी.आज स्त्री नोकरी करून घर पण सांभाळत आहे बऱ्याच ठिकाणी पुरुषी वर्चव आहे आणि त्या स्त्रीला घरातील सर्वासाठी राबाव लागत. म्हणून स्त्री पण वंशज झाली तर तिचे आई-वडील तिला मदत करू शकतील, नोकरी करणाऱी स्त्री जरी असली तरी मुलाच्या मागे वडिलांचेच नाव आहे. हा समस्त़ स्त्री जातीवर अन्यायच नाही का ? यासाठीच स्त्री ही वंशज झाली पाहिजे. जननी ही वंशज व्हायला हवी…सौ.कल्पना शैलेश तांबट,कवीयत्री, लेखीका व सामाजिक अभ्यासक, सो.क्ष.कासार समाज महिला मंडळ, खामगांव मो. 82750 27894

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button