महाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनानिमित्त खातखेड ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण संपन्न होऊन वृक्षारोपण, तसेच तालुक्यातील स्पर्धा परीक्षेमध्ये यश

स्वातंत्र्य दिनानिमित्त खातखेड ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण संपन्न होऊन वृक्षारोपण, तसेच तालुक्यातील स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षण क्षेत्रात सेवा देणाऱ्या शिक्षकांचा तसेच रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार समारंभ करण्यात आला.(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )शेगांव- खातखेड ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सहायक मिनाक्षी नारायण उन्हाळे(भोसले) , यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर वृक्षारोपण करून आझादी का अमृत महोत्सवाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांपैकी मिनाक्षी नारायण उन्हाळे(भोसले) , सहायक आयुक्त, डॉ. प्रवीण पाटील ओझोन हॉस्पिटल अकोला, प्रा . मुंगुटराव थारकर, प्रफुल अगळते रेल्वे विभाग, सागर सोनोने पोलिस उपनिरीक्षक, क्षमा भांबेरे, पोलिस उपनिरीक्षक, उमेश बोंद्रे HDFC बँक , मोहन उन्हाळे sbi बँक, अशोक उन्हाळे BSF, डॉ. शिवाजी वाघ, अशोक उन्हाळे आरोग्यसेवक, ई. विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला..यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शितल रामेश्वर थारकर, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार समाधान सोनोने, गटविकास अधिकारी देशमुख सर, ठाणेदार शेगाव ग्रामीण श्री. वडगावकर सर, तालुका कृषी अधिकारी नावकार सर, गट शिक्षण अधिकारी श्री. वायदंडे मॅडम, CDPO सौ. धनोकार मॅडम, THO खामगाव श्री. वानखडे सर, BMMV शेगाव. श्री. बोबडे सर , गावंडे सर, हिवाळे मॅडम, तलाठी तायडे, D.N. राठोड कृषी सहायक, ग्रामसेवक बजोले साहेबशिवसेना शेगांव तालुका रामा पाटील थारकर, उपसरपंच अन्नपूर्णा तलवारे , सदस्य पद्मा उन्हाळे, शंकर थारकर, कविता ईलामे , आणि समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक घुले सर, सूत्रसंचालन जया विरोकार मॅडम, तर आभार प्रदर्शन आकाश थारकर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button