प्रत्येकाने घरावर राष्ट्रध्वज फडकावून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी –

*प्रत्येकाने घरावर राष्ट्रध्वज फडकावून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी –
– आ अँड फुंडकर. स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे खामगाव::-* प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर देशाचा राष्ट्रध्वज फटकावून आपल्या भारत देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन खामगाव मतदार संघाचे आमदार अँड आकाश फुंडकर यांनी केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षभरपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान यावर्षी सुध्दा राबविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावून देशाप्रती आपली देशभक्ती प्रगट करावी. उद्या १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी सकाळी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावावा आणि सायंकाळी सूर्यस्ताआदी तो आदराने उतरवावा. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. तसेच या अभियानात सहभागी घोऊन harghartiranga.com या पोर्टलवर जाऊन राष्ट्रध्वज सोबत आपला सेल्फी फोटो काढून अपलोड करावा असे आवाहन सुध्दा आ अँड आकाश फुंडकर यांनी केले आहे.



