महाराष्ट्र

आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आरोग्य संस्था मधून देण्यात येणार मोफत आरोग्य सेवा

*आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आरोग्य संस्था मधून देण्यात येणार मोफत आरोग्य सेवा* –

*आमदार ऍड आकाश फुंडकर**तमाम जनतेस महायुती सरकार कडून स्वातंत्र्य दिनाची भेट.**राज्यात भाजपा युती सरकार आल्यापासून जनसामान्यांना विविध योजना व सुविधा देण्यात येत आहेत. सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी आरोग्य सेवा ही सुधारण्यात आली असून आता संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शासकीय रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवा तपासणी व त्याबाबतच्या रुग्ण शुल्क न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गोरगरीब, शेतकरी व सर्वसामान्य जनतेला शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे, प्रतिपादन आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.*राज्यात महायुतीची सरकार आल्यापासून सर्वसामान्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.**या स्वातंत्र्य दिनापासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी देणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांचा समावेश असतो या रुग्णांना क्वचित प्रसंगी उपचारा करीता, तपासणी करता, शासन निर्णय क्रमांक एक अन्वये माफक दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तथापि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना आर्थिक विवंचनेमुळे व बऱ्याचदा मापक दरातील आरोग्य सुविधा सुद्धा घेणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.**असे रुग्ण औषधोपचांरांपासून वंचित राहू नये याकरिता मा. मुख्यमंत्री महोदयांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधान नि:शुल्क करण्याबाबत विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे.* *तसेच दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली शासकीय रुग्णांलयामध्ये करण्यात येणाऱ्या तपासण्या व उपचार तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील वैद्यकीय सेवा (राष्ट्रीय रक्त धोरणानुसार व रक्तपुरव घटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे शुल्क वगळून) निश्चित करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे.**आज स्वातंत्र्य दिनाच्या पासून ही मोफत / नि:शुल्क आरोग्य सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली, त्यानुसार आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 पासून आरोग्य सेवा व इतर तपासण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत.* स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे*राज्यातील महायुतीच्या सरकारने अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय घेऊन राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना आदेश दिले असून या आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या रुग्णांना शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारावर निःशुल्क नोंदनी करण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांमध्ये होत असलेल्या सर्व प्रकारच्या तपासण्या नि:शुल्क करण्यात येणार आहेत व कोणत्याही प्रकारचे दर आकारण्यात येऊ नये असे सुचित करण्यात आले आहे. बाह्य रुग्ण विभागांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना बाहेरून औषधी व इतर कंज्यूमेबल खरेदी करण्याकरता चिठ्ठी देऊ नये, क्वचित प्रसंगी बाहेरील औषधी रुग्णास देणे आवश्यक असल्यास आर के एस अनुदानातून स्थानिकरित्या औषध खरेदी करून रुग्णास मोफत उपलब्ध करून द्यावे.आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या चाचण्या उदाहरणार्थ इसीजी, एक्सरे, सिटीस्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या इत्यादी यांचे शुल्क आकारण्यात येऊ नये, आंतर रुग्ण विभागांमध्ये दाखल असलेल्या रुग्णास डिस्चार्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये. यापूर्वी रुग्णाकडून जमा करण्यात आलेले शुल्क शासन खाती अथवा रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करण्यात यावे व त्याबाबतचा लेखाजोखा अद्यावत करण्यात यावा.तसेच मोफत सेवेबाबत तक्रार निवारण केंद्रासाठी टोल फ्री क्रमांक 104 हा देण्यात आलेला असून त्याबाबत संबंधित संस्थाप्रमुखाला तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक यांना अवगत करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या तक्रारीची निवारण करण्याची जबाबदारी संबंधित संस्थाप्रमुखांची राहील आरोग्य संस्थेमध्ये शुल्क आकारण्यात आल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचारी / अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात ची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची राहील यासाठी संनियंत्रण समिती देखील स्थापन करण्यात आली असून जिल्हा शल्यचिकित्सक त्यांच्या अध्यक्षतेत खाली सनियंत्रण समिती राहणार आहे.रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याची घोषणा केल्यामुळे मा मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी आभार मानले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button