बुलढाणामहाराष्ट्र

गावातील दिव्यांग व्यक्ती श्री. श्रीराम जगदेव हरमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

मौजे जनुना तालुका खामगाव येथे 15 ऑगस्ट दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने गावातील दिव्यांग व्यक्ती श्री. श्रीराम जगदेव हरमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण………

( जी.डी. रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)

आज 15 ऑगस्ट निमित्त जनुना ग्रामपंचायत वतीने आयोजित एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष .सरपंच .सौ सुवर्ण संदीप गोरे ,तर प्रमुख उपस्थिती कर्नल श्री परम शिव शेजव साहेब , तसेच शाळा सुधार समितीचे अध्यक्ष श्री. गणेश कोंडे ,तंटामुक्ती अध्यक्ष श्री. गणेश हरमकार, तसेच ग्रामपंचायत चे पूर्ण सदस्य तलाठी श्री. ठोसरे साहेब ग्रामसचिव मॅडम अंगणवाडी सेविका इतर कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत च्या वतीने जे देशाचे रक्षण करतात अशा सर्व सैनिकांचे आई-वडील पत्नी सहपरिवाराचा सत्कार ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला .तसेच यादरम्यान गावातील गुणवंत विद्यार्थी यांचा सुद्धा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. व नवीन अंगणवाडी येथे नवीन वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button