खानदेशजळगावा जिल्हा

*भूसंपादीत केलेल्या जागेवर होत असलेले अतिक्रमण थांबवण्यासाठी निंभोरासीम ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*जळगाव – रावेर तालुक्यातील निंभोरासिम येथे मागासवर्गीय वस्तीच्या पुनर्वसनाकरिता महाराष्ट्र शासनाने भूसंपादित केलेल्या जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून होत असलेले बांधकाम थांबवण्यासाठी व सदर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी निंभोरासिम येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले . सदर निवेदनात नमूद निवेदनकर्त्यांनी लिहिलेले आहे की , ” मौजे निंभोरासिम येथील मागासवर्गीय वस्तीच्या पुनर्वसनाकरिता निंभोरासिम येथील भूसंपादन जमीन शेत गट नंबर 167 क्षेत्र 91 आर यावर अनधिकृत बांधकाम करून हि जमीन शासनाच्या मालकीची असतांना देखील सदर जमिनीवर सुरेश सिताराम पाटील व इतर तीन इसमांनी अतिक्रमण करून बांधकाम केलेले आहे व हल्ली देखील बेकायदेशीररित्या बांधकाम सुरू आहे वास्तविक पाहता सदर जमिन मागासवर्गीय समाजाच्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाचा आदेश झालेला आहे. याबाबत अतिक्रमणधारक व्यक्तींना पूर्णपणे माहिती व कल्पना आहे. तरी देखील सदर व्यक्तींनी शासन संपादित जमिनीवर पक्के आरसीसी बांधकाम केले आहे आणि हल्ली सुद्धा बांधकाम करीत आहेत. सदर व्यक्तींच्या या बेकायदा कृत्याबाबत आम्ही यापूर्वी देखील जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दिलेली आहे. त्यानुसार फैजपूरचे उपविभागीय अधिकारी यांनी सदरचे बांधकाम थांबवणे बाबत तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सूचना दिलेल्या आहेत. तरी देखील संबंधितांनी प्रशासकीय सूचनेला न जुमानता भूसंपादित जमिनीवर बांधकाम सुरू केलेले आहे. निंभोरासिम या गावात मागासवर्गीय समाज अत्यल्प असुन अशा पद्धतीने आमचे वर अन्याय होत आहे. तरी मागासवर्गीय समाजाच्या पुनर्वसनासाठी शासनाने संपादित केलेल्या या जमिनीवर झालेले व सुरू असलेले बांधकाम निष्काशीत करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास यावे व मागासवर्गीय समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी मुकुंद सपकाळे, दिलीप सपकाळे राजू सवर्णे, राजेंद्र सवर्णे, विकास सवर्णे, संजय सवर्णे, किरण सवर्णे, सुनील सवर्णे, मगन सवर्णे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, वसंत सवर्णे, जीवन सवर्णे, पंडित सवर्णे आदींनी केलेली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button