पाचोरा येथील पत्रकाराला मारहाण प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सर्व पत्रकार बांधवाना उपस्थितीचे आवाहन

⚫ पाचोरा येथील पत्रकाराला मारहाण प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सर्व पत्रकार बांधवाना उपस्थितीचे आवाहन ⚫
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
⚫ जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव आज सायंकाळी 4 वाजता ⚫
जळगाव (प्रतिनिधी ) ;- पाचोरा येथील पत्रकार संदीप माहाजन यांना बुधवारी दुपारी नगरपालिकेसमोर तोंडावर रुमाल टाकून त्यांना खाली पाडून काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याचा प्रकार अतिशय निंदनीय असून गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आज १० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ठीक ४ वाजता मारहाण करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्व पत्रकार बांधवांनी आज दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा तर्फे करण्यात आले आहे.
इतर संघटनेच्या पत्रकार बांधवांनी सुध्दा यावे ही विनंती



