महाराष्ट्र

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील जुगार मटका बंद करण्यासाठी नागरिकांचे निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव :- जऊळका येथील जुगार मटका बंद करण्यासाठी नागरिकांनी जऊळका पोलीस स्टेशन ला निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की बसस्टैंड वर खुले आम अवैध धंदे सुरू जऊळका व आसपासच्या परिसर हा डोंगराळ व आदिवासी बहुल भागातील आहे येथील लोक गोरगरीब बसून ते आता वरली मटक्यामुळे कर्जबाजारी होत आहेत या वरली मटक्यामुळे अनेक ठिकाणी आत्महत्या झाल्या असून अनेकांचे संसार उघडे पडलेले आहे म्हणून हे वरली मटका ताबडतोब बंद करण्यात यावा त्यावर सागर धोंगडे दीपक आगलावे सुरज तायडे प्रवीण पाटील महेश वाळके अजय पांडव गजानन पांडे प्रवीण धोंगडे गजानन ठाकरे दत्ता करवते अमोल आगलावे आदींच्या सह्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button