लोकशाहीचे खरे न्यायाधिश आम्हीच !

लोकशाहीचे खरे न्यायाधिश आम्हीच !
जळगाव महापालिका नेहमीच चर्चेचा विषय बनलेली आहे.आधी भ्रष्टाचार मुळे धुळे पासून दिल्ली पर्यंत प्रसिद्ध झाली.आता पुन्हा तेच.रस्ता व गटार बांधकामात मोठा अपहार चालू आहे.अनेक ठिकाणी वर्क काढून महानगरपालिकेच्या इमारतीत टेबलावर रस्ता बनवला जातो.त्याच टेबलाखालून गटार वाहाते.जुना रस्ता,जुनी गटार मोजून एमबी भरली जाते.काम शुन्य आणि पैसा हजम होतो. नगरसेवक व नागरिकांचा समज झाला आहे की, जळगाव ची ही सतरा मजली इमारत शापित आहे.ती फक्त नगरसेवक व अधिकाऱ्यांचे पोषण करण्यासाठी आहे.आणि नागरिकांचे शोषण करण्यासाठी आहे.हा समज दूर करणे आवश्यक झाले आहे.ते कसे? पुढील निवडणुकीत एकही नगरसेवक रिपीट करूच नये.त्यासाठीच तर लोकशाहीत, संविधानात दर पांच वर्षांनी निवडणूक घेणे बंधनकारक आहे.जर आमचा नगरसेवक बिघडला,माजावर आला, गुन्हेगार बनला,चोर निघाला तर त्याला पुन्हा निवडून देऊ नये म्हणून. काही नागरिक नगरसेवकांच्या विरोधात कोर्टात जातात.कोर्ट म्हणते,येथे येऊन कशाला डोकेमारी करतात?चोर, भ्रष्टाचारी, गुन्हेगार नगरसेवकांना तुम्हीच हाणून पाडा.तो अधिकार तुम्हाला आहेच.मताचा. पटले.कोर्टाचे म्हणणे पटले.आम्हीच खरे लोकशाही चे न्यायाधिश आहोत.आता एक ही नगरसेवक रिपीट करायचा नाही.आम्हीच नगरसेवक निवडून द्यायचा.त्याने भ्रष्टाचार करायचा.बोललो तर त्याने चाकू सुरी पिस्तूल चालवायचा.हे आता परवडणारे नाही.आता जळगाव महापालिका महासभेत सभ्य, सज्जन, प्रामाणिक, उच्चशिक्षित माणसांना निवडून पाठवावे लागेल….
शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत मंच जळगाव



