महाराष्ट्र

पांगरी नवघरे येथील साठवण तलावाच्या भिंतीला व तोंडाला तडे

पांगरी नवघरे येथील साठवण तलावाच्या भिंतीला व तोंडाला तडे

वेळेचं लक्ष न दिल्यास हजारो हेक्टर वरील जमिनीचे नुकसान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या लघु सिंचन तलावाला बऱ्याच प्रमाणात भिंतीला साळ प्राण्यांनी तथा तोंडाला निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळे तडे गेले आहे सदर भिंतीवरील झाडाझुडपाचे प्रमाणही अत्यंत वाढले आहे झाडाझुडपामुळ तसेच धरणाच्या भिंतीच्या पायथ्याशी साळ या प्राण्याचे वास्तव्य असल्यामुळे भिंतीला भविष्यात तडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते
पांगरी नवघरे लघु सिंचन विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराला तडे जाण्यासंदर्भात शेतकरी वर्गाने अनेक वेळा तक्रारी दाखल केलि आहे मात्र मालेगाव येथील लघु सिंचन विभाग याकडे साम्य दुर्लक्ष करत उलट सुलट शेतकऱ्यांनाच आपणच छिद्र पाडले असल्यास अशा प्रकारची उलट सुलट उत्तरे संबंधित विभाग देत असून जवळपास दीडशे ते २०० एकरावर पसरलेल्या लघु सिंचन विभागांमध्ये आत्ताच कुठेतरी ६० टक्के जलसाठा असून अशा सततच्या पावसामुळे शंभर टक्के जलसाठा होण्यास वेळ लागणार नाही सदर जल साठ्याची प्रमाण अत्याधिक झाल्यास धरणा खालील व भिंतीखालील हजारो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान होण्याची दाट शक्यता आहे सदर भिंतीवरील व धरणाच्या आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात २२-२३या कालावधीत काम केल्याचे कळत असून याबाबत नव्याने रुजू झालेल्या जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाहणी करून त्या संदर्भातील मजकूर व लेखाजोखा संबंधित शेतकऱ्यांच्या लक्षात आणून किती रुपयाचे काम झाले या संदर्भातील माहिती देणे गरजेचे आहे.
मालेगाव तालुक्यात आधीच नेमण्यात तुम्ही निम्म्यात आम्ही या चर्चेला सर्वाधिक पसंती दिली आहे कुठल्या विभागाचे काम असो, थातूरमातूर पद्धतीनेच केल्या जात असून वरिष्ठ ही तितक्याच मेहरबानीने दर अधिकार्‍याची पाठराखण करत असतात एकीकडे जिल्ह्यात महसूल सप्ताह मोठ्या गाजावाजा करत सुरू असताना दुसरीकडे त्याच महसूल विभागाचे घटक म्हणून शेतकरी वाऱ्यावर सोडण्याचे चित्र पाहायला मिळत आहे सदर भिंतीला गेलेल्या तळ्याची दुरुस्ती करावी अन्यथा आमच्याकडे उपोषण आणि अमर उपोषण हाच पर्याय उरला अशी मागणी पांगरी नवघरे येथील शेतकरी गजानन नवघरे गणेश नवघरे आधी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे

शेतकरी बॉक्स:

पांगरी नवघरे येथील शेतकरी गणेश नवघरे यांच्या मते सदर लघु सिंचन विभाग कार्यालय यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली आहे मात्र कुठल्याही प्रकारची दखल अद्याप पर्यंत संबंधित विभागाकडून घेण्यात आली नाही दरवर्षी लोक वर्गणी करून संबंधित पडलेल्या तळ्याला पुजण्याचे काम आम्ही करत आहोत लाखो रुपयांचे छाटछुट कामे व छाटणी कामे भिंतीवर केल्या जातात आणि परस्पर मलिदा खाल्या जाते या संदर्भातही चौकशी होणे गरजेचे आहे

प्रतिक्रिया

लघु सिंचन विभागाच्या अधिकारी श्रीमती प्रियंका बोर्डे कनिष्ठ अभियंता जलसंधारण विभाग मालेगाव यांच्या मते या संदर्भात तक्रार आली आहे पण सदर कामकाजा संदर्भात निधी मागणी केलेली असून अद्याप पर्यंत मंजुरात आली नसल्यामुळ यावर्षी ते काम काजकरता येणार नाही असे सांगण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button