
पुलवामा हल्ल्या मध्ये शहीद झालेले मलकापूरचे सुपुत्र श्री संजयसिंग राजपूत ह्यांच्या पत्नी श्रीमती सुषमा संजयसिंग राजपूत..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस व्हि.एम.घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधि.
तेल्हारा.२६जुलै २०२३रोजी श्री अनंतराव भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे तेल्हारा तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने कारगिल विजय दिवसनिमित्याने शहिदांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली
तसेच पुलवामामध्ये शहीद झालेले मलकापूरचे सुपुत्र श्री संजयसिंग राजपूत ह्यांच्या पत्नी श्रीमती सुषमा संजयसिंग राजपूत ह्यांचा सन्मान सौ जवकार ताई व सौ वानखडेताई यांच्या हस्ते करण्यात आला
कार्यक्रमाची सुरुवात विश्रामगृह पासून मोटर सायकल रॅलीने करण्यात आली.प्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,तथागत गौतम बुद्ध , क्रांती सुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले,राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये युद्धातील रनगाड्याला मानवंदना देण्यात आली,तेथून पुढे अग्रसेन महाराज टावर चौक येथे जाऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले,मोटारसायकल रॅलीने कार्यक्रम स्थळी विरपत्नीचे आगमन झाले,
मंचकावर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत सुभेदार सुरेशराव जवकर साहेब होते,प्रमुख अतिथी विरपत्नी सुषमा राजपूत, तेल्हारा तहसिलचे तहसीलदार श्री राणे साहेब, तेल्हारा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री सचिन यादव साहेब,स्वामी विवेकानंद ज्ञानपीठच्या प्राचार्या सौ,भागवत मॅडम,माजी सैनिक बाळकृष्ण बोदळे, माजी सैनिक सुधाकर सुरळकर साहेब होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक पांडुरंग खुमकर यांनी केले
याप्रसंगी श्री विशाल जळमकर यांच्या संचाद्वारे देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले यामध्ये कु स्नेहल दुगणे, श्री श्रीधर बावस्कर कु स्नेहल धर्माळे ह्यांनी गीत सादर केले, यावेळी सर्व माजी सैनिक, माजी सैनिक परिवार, स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ,शेठ बन्सीधर विद्यालयाचे विद्यार्थी , शिक्षकवृंद तेल्हारा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
सर्व मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले,आभार प्रदर्शन माजी सैनिक ज्ञानेश्वर नेमाडे यांनी केले, कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत, व शहीद जवान अमर रहे,भारत माता की जय या जयघोषाने संपन्न झाला,
कार्यक्रम यशस्वी करण्या करीत माजी सैनिक संघटनेचे माजी सैनिक नानासाहेब इंगळे,अशोक मानकर,वसंत रोठे,रामदास लासुरकर राम पाऊलझगडे,विलास टोलमारे,कमलाकर दुगाने, मिलिंद बोदळे,धनराज वानखडे,भास्कर माळोकार ,सुरेश तेलगोटे, खंडाळकर ,यांनी विशेष परिश्रम घेतले



