अंधारात बसलेल्या संशयीतयुवकाला पोलिसांनी पकडले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव | आज पहाटे ३ वाजता सुमारास अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या संशयीत युवकास शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे विरूध्द कारवाई केली. सदर युवक हा काशेलानी पेट्रोल पंपाजवळ चेहरा झाकून काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने अंधारात लपून बसला होता.
पहाटे ३.१५ वाजता गस्ती दरम्यान पोहेकॉ गजानन वाघमारे यांना आरोपी सतिष शिवराम पिल्लेवार (२०), रा. चांदमारी खामगाव येथील हा युवक अंधाराचा फायदा घेत स्वतःचे अस्तित्व लपवित असताना मिळून आला. आपला चेहरा झाकुन काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो दबा धरून बसलेला आढळून आला. अशा संशयित वागण्यावरून पोलिसांनी त्याचेविरुद्ध कलम १२२. १२४ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करून त्या युवकाकडून एमएच २८ पी ४१४० क्रमांकाची दुचाकी जप्त केली. घटनेचा पुढील व तपास पोना निलेश गाडगे हे करीत आहेत.




