जळगावा जिल्हामहाराष्ट्रसंपादकीय

जलगांव तांबापुरा खुश हुआ!

जलगांव तांबापुरा खुश हुआ!

 जळगाव तांबापुरा हा महापौर व विरोधी पक्ष नेत्यांचा प्रभाग.येथे हिंदू मुस्लिम गरीब लोक राहतात.मजुरी करणे, भंगार जमा करणे,मटण बनवणे असे छोटे मोठे व्यवसाय करून चरितार्थ चालवतात.यांची घरे लहान लहान.जमीनदोस्त.बारीक गल्ली बोळ.म्हणून येथे पैसे देऊन मत मिळवणे आजपर्यंत सोपे होते.पण आम्ही आता कठीण करून ठेवले आहे.लोकांना जागृत केले आहे.बोले,"अब हम वोट नहीं बेचेंगे."
दिड महिन्यांपूर्वी आम्ही येथे येऊन उलटी गटार बाबत आक्षेप घेतला होता.दोन्हीकडून जबरदस्तीने गटारी तांबापुरात आणून सोडल्या.नंतर बारा तारखेला जोरदार पाऊस झाला.दोन्ही गटारींनी अर्धे जळगाव चे पाणी तांबापुरा, फुकटपुरात आणून सोडले.पुढे जुनी ,अरूंद ,उथळ गटार.पाण्याला जागा पाहिजे.सरळ उतरले गल्लीत.गल्लीतून घरात.खाटा,गोधळ्या ,बकऱ्या, कोंबड्या घेऊन लोक बाहेर पळाले.ही अशी परिस्थिती का आली?
जर डी मार्ट आणि इच्छा देवीकडून गटार येथेच आणायची होती तर आधी येथून मोठी गटार बाहेर पडायला हवी होती.
जळगाव महापालिकेने आमदार आणि महापौर यांच्या सौजन्याने या कामाचा मक्ता भाचेजावई ला देऊन टाकला होता.पण काम नाही केले.आमदार आणि महापौर दोन्ही खुष.जुनी बारीक गटारी वर धकले तर धकले.पण नाही धकले.
 बारा तारखेला पाणी घरादारात शिरल्याने आम्ही जळगाव जागृत जनमंच ने बोंब ठोकली.तांबापुरा जागृत केला.अरे यारो,ये अस्मानी संकट नही.ये तो सुलतानी संकट है.आमदार और महापौर ने तोहफा दिया है.जर अब्दुल हमीद चौकापासून हायवे कडे जाणारी मोठी गटार बांधली तर हे संकट टळू शकते.म्हणून आम्ही माजी महापौर मा.नितीन लढ्ढा यांच्या माध्यमातून सिटी इंजिनिअर श्री सोनगिरे यांना साईट वर बोलवले.ते आले.म्हणाले,काका, पुढील गटार बांधकामाची वर्क ऑर्डर तर आम्ही दोन वर्षांपूर्वी दिली आहे.तर त्या मक्तेदाराने गटार बांधली पाहिजे.पण ते आमदाराचे नातेवाईक असल्यामुळे आम्ही जास्त जोर जबरदस्ती करू शकत नाहीत.नाहीत ते आमचा गो.रा.खैरनार करतील.

तेथूनच आम्ही गौरव पाटील व सब ठेकेदार नाईक यांना विचारले.परिस्थितीचे गांभीर्य सांगितले.तर म्हणाले,काका, सोमवारी काम सूरू करतो.
सोमवारी गटारीचे काम सुरू केले.जुनी गटार वरील डाटा,फरशी वगैरे तोडणे चालू केले.एका बारीक गल्लीत रहिवाशांनी थोडी आणाकाणी केली.तर बोलवल्यानंतर आम्ही गेलो.येथे वापरा साठी तात्पुरती सोय करण्याचे सांगितले तेंव्हा विरोध मावळला.माझेसोबत असलेले लाल शर्ट मधील तरूणाने त्यांच्या घराची अडचण सांगितली.घर खाली आणि गटार वर.पाणी सुटले की,घरातच येईल.तशी खबरदारी घेऊन जेसीबी ने काम सुरू केलें.लोक खुष झाले.
या गटार बांधकाम मुळे तांबापुरा खुश झाला.हिशोब करू लागले.आता आपण पावसाचे पाण्यात बुडणार नाहीत.
तरीही सिटी इंजिनिअर श्री सोनगिरे यांना विनंती केली की,या कामाचे टेक्निकल इन्फॉर्मेशन बोर्ड ताबडतोब लावा.”मेरी गलीमे गटार बन रही,देखकर लोग खुष होंगे.”

… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button