जिल्हा सेवा प्राधिकरण वाशीम तर्फे शाळाबाह्य विध्यार्थी

जिल्हा सेवा प्राधिकरण वाशीम तर्फे शाळाबाह्य विध्यार्थी सर्वेक्षण संपन्न
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम – : वाशिम 23 जुलै 2023 रोजी जिल्हा सेवा प्राधिकरण वाशीम तर्फे जे विध्यार्थी शाळेत जात नाहीत अश्या मुला आणि मुलींचा सर्वे करण्याच्या सूचना व्हीं.एन. टेकवानी साहेब ( जिल्हा सचिव व न्यायधिश जिल्हा सेवा प्राधिकरण वाशीम ) यांनी वाशीम जिल्ह्यातील सर्व विधी स्वयंसेवक यांना दिल्या होत्या.त्यांचा आदेश पाळून दिनांक 23 जुलै 2023 रोजी वाशीम जिल्हा सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयसेवक जगदिश मानवतकर आणि उत्तम धाबे यांनी काटा , कोंडाळा , तोरणाळा , कार्ली गुंज येथे जाऊन सरपंच ,उपसरपंच ,पोलीस पाटील, अंगनवाडी सेविका , आशासेविका यांच्या मदतीने हे सर्वेक्षण केले.
यावेळी जिल्हा सेवा प्राधिकरण महिला ,बालक ,ज्येष्ठ नागरिक यांच्या साठी काय सेवा देते,आपण कोणत्याही प्रकारचा खर्च न भरता अगदी मोफत आमच्या जिल्हा सेवा प्राधिकरण तर्फे कसा लाभ मिळवू शकता ,महिला ,बालक आणि जेष्ठ नागरिक यांचे कोणते कायदे आहेत ? , महाराष्ट्र सेवा प्राधिकरण,जिल्हा सेवा प्राधिकरण,तालुका सेवा प्राधिकरण आपल्यासाठी कशी मदत करते ? ,खुप वर्षापासून प्रलंबित असणारे प्रकरण आपण कसे लोकअदालत मध्ये निपटु शकता ? , आपणास जिल्हा सेवा प्राधीकरण मोफत कशी माहिती देते ? ,आपण गावात मोफत शिबिर कसे राबवू शकता ? या व इतरही प्रकारची माहिती या सरवेक्षणात दिली.यावेळी जिल्हा सेवा प्राधिकरण चे विधी स्वयंसेवक जगदीश मानवतकर , उत्तम धाबे यांनी परिश्रम घेतले.तसेच यावेळी सर्वेक्षण करण्यात आलेल्या गावातील विशाल मुंढे , गोविंदराव पाटील , संतोष लांडकर , नितीन खडसे ,शिवाजी देशमुख , अमोल मोरे , महादेव धवसे, दत्ता बनसोड यांनी सहकार्य केले.यावेळी गावात जिल्हा सेवा प्राधिकरणाचे माहिती पत्रके ,प्रसिध्दी पत्रके नागरिकांना वाटण्यात आली .



