भारसाकळे दाम्पत्यांना वाचविणार्या युवकांना वंचित बहुजन आघाडी ने केले सम्मानित

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा तालुका प्रतिनिधि व्हि.एम.घोडे
तळेगाव/तेल्हारा.दि.23 गेल्या दोन दिवसांमध्ये तेल्हारा शहरासह पूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे बहुतांश भागात पूर परिस्थिती उद्भवली या पुरा मध्ये तळेगाव बाजार येथील भारसाकडे दांपत्य अडकले होते. रात्री दोन वाजता येथील युवकांनी चराटाच्या साह्याने पति व पत्नी दोघांनाही सुखरूप बाहेर काढले त्यांना शाल व श्रीफळ देऊन वंचित बहुजन आघाडी ने सम्मानित केले.
तालुक्यात दोन दिवसाआधि तळेगाव बाजार येथील विदृपा नदीला पूर आल्याने येथील रामेश्वर भारसाकडे व सौ संगिता भारसाकडे यांचे घराला पुराने वेढा घातला होता भारसाकडे कुटुंबाने आरडाओरड केली असता तळेगाव बाजार येथील युवक संतोष खारोडे ,मिलिंद बोदळे ,दादाराव बोदळे यांनी चराटाच्या साह्याने या पति पत्नीला पुरातुन बाहेर काढले या निमित्ताने त्यांचा सम्मान वंचित बहुजन आघाडिचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, वि.संतोष राहटे ,प्रभाताई सिरसाट ,शोभाताई शेळके ,जिल्हा परिषद अध्यक्ष संगिता अढाउ ,दिपक बोडखे, निलोफर शा ,तेल्हारा तालुका अध्यक्ष अशोकराव दारोकार, चरण ईगंळे ,रोकडे ,जिया शा, खरेदी विक्री संचालक वैशाली खारोडे ,रोषन दारोकार ,संदिप गवई ,धम्मपाल दारोकार, राजिकभाई ,मधुकर ठोंबरे ,सजंय राऊत ,माजी उपसरपंच रतन दांडगे ,देवा भड ,रवि बोदळे ,सुभाष भड ,शेख मुजफ्फर ,विलास हिवराळे यांच्या हस्ते करण्यात आला,या कार्यक्रमाचे आयोजन खरेदी विक्री संघाचे संचालक वैशाली खारोडे यांनी केले होते यावेळी पुराने नुकसान झालेल्या घराची पाहणी प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, अशोकराव दारोकार, संगिता अढाउ ,शोभाताई शेळके यांनी पाहणी केली



