तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी

*तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी
*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी-व्ही एम घोडेतेल्हारा दि 22. गेल्या दोन दिवसातील पावसाची परिस्थिती पाहता तेल्हारा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला असून संपूर्ण तालुक्यातील गावामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. तेल्हारा तालुक्यात सरासरी अतिवृष्टीची नोंद146.1मी, तेल्हारा मंडळ 13.3 माळेगाव 144.3 हिवरखेड 149.3 आडगाव १७६.५ पंचगव्हाण 130.3. तेल्हारा येथील बस स्थानक परिसरातही खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून नागरिकांना ये-जा करताना अडचन होत आहे तथा शहरातील जिजाऊ उद्यान सहित विविध भागात पाणी साचले आहे.गौतमा नदिला ही पुर आला असुन तेल्हारा शहरासह तालूक्यातील माळेगाव येथे चंपा माता मंदिर परिसरातील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे वाहतूक तूर्तास बंद ठेवण्यात आली, यासह बेलखेड मधील आस नदीला देखील पूर आलाय पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता बंद ठेवण्यात आला तसेच तेल्हारा तालुक्यातील मनात्री येथील नदी दुथळी भरून वाहत आहे ,तळेगाव बाजार ते अडगाव परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे रस्ता बंद आहे तसेच अकोली शिरसोली येथील रस्ता सुद्धा अतिवृष्टीमुळे तूर्तास बंद आहे. वरुड बु.येथे अतिवृष्टी झाल्यामुळे गावात पाणी शिरले असुन काहिंच्या घरात पाणि शिरले आहे येथील भागात मुसळधार पाऊस असल्यामुळे प्रवाहाची गती खुप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे परिसरातील गुरं,शेळ्या प्रवाहामध्ये वाहून गेले, तर एका शेतकरी बांधवाची पाण्याची मोटर वाहुन गेली ,तर काहींच्या झोपड्या वाहुन गेल्या, वरुड बुद्रुक सह राणेगाव ,भोकर, जस्तगाव घोडेगाव ,वाडी ,ऊकळी बाजार,पाथर्डी या गावासह ईतरही काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ,विद्रूपा नदी व नाल्याला आलेल्या पुरामुळे मनब्दा,भांबेरी रस्ता बंद आहे ,पाथर्डी गावातील दोन व्यक्ती विद्रुपा नदीला आलेल्या पुरामुळे शेतातच अडकलेले होते त्यांना जिल्हा शोध व बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे त्यांची नावे राजू देठे व भारसाकडे बंधू राहणार पाथर्डी हे असून यांचा बचाव करणारे जिल्हा शोध व बचाव पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या परिसरात पुर्विपासुन रस्त्याचे कामं सुरू असल्यामुळे रस्त्यांनी ये-जा करताना नागरीकांना अतोनात त्रास सहन करावा लागत असुन मध्येच हा निसर्गाचा कोप झाला आहे,अशा परिस्थितीमध्ये तेल्हारा तालुक्यातील नागरिकांचे जीवन संकटात सापडले असुन याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तसेच तेल्हारा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अटकळी येथील रहिवासी वासुदेव डोमाजी वानखडे यांच्या शेतातील श्रीराम कंपनीचे दोन सेट स्पिंकलर विद्रुपा नदीला आलेल्या पुरात वाहून गेले यांच्या शेताला लागूनच विद्रुपा नदीपात्र आहे. काही भागात परिस्थिती पूर्ववत होत आहे .तसेच तालुक्यातील नागरिकांनी या परिस्थितीबाबत माहिती तेल्हारा तहसील कार्यालयाला भ्रमणध्वनी च्या माध्यमातून दिली आहे . तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिकाचे पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी संपूर्ण तालुक्यातील नुस्कानग्रस्तां कडून मागणी होत आहे.✍️



