बुलढाणामहाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने

पांगरे कुटे येथे जलद गाड्यां न थांबल्यास शुक्रवार दिनांक 21/07/2023 रोजी चक्काजाम आंदोलन

जलद गाड्यांचा थांबा मिळण्याबाबत च्या संदर्भात वाशिम आगरकरला दिले पत्र

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम -: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क नेते विठ्ठल लोखंडकर व जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे यांच्या मार्गदर्शनात व
मालेगाव तालुका अध्यक्ष गजानन पाटील कुटे यांच्या नेतृत्वात पत्र दिले.

वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, वाशिम तालुका संघटक रघुनाथ खूपसे,मालेगाव तालुका संघटक महेश देशपांडे यांच्या उपस्थितीत पत्र देण्यात आले.

मालेगाव ते मेहकर रोडवर धावणाऱ्या जलद गाड्या पांगरी कुटे येथे आपल्या महामंडळाची एकही बस थांबत नसल्यामुळे या अगोदर पत्र देऊनही सुद्धा आता पर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नसून 30 जून पासून पूर्ण शाळा चालू झाल्या आहेत तरी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट गाड्याने दर महिन्याला हजार रुपये महिन्याचे भाडे द्यावे लागत आहे.

गोरगरीब जनतेला हे भाडे देणे शक्य नसल्यामुळे व वय वृद्ध अपंग व्यक्तींना व महिलांना सवलत असून सुद्धा कोणताच उपयोग घेता येत नाही मालेगाव ते मेहकर रोडवर पांगरी कुटे ते मालेगाव 7 किलोमीटर चे भाडे 20 रुपये द्यावे लागते वरील सर्व बाबीचा विचार करून येत्या 10ते 12 दिवसाच्या आत पांगरी कुटे इथे मालेगाव मेहकर रोडवर जाणाऱ्या गाड्यांचा थांबा न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पांगरी कुटे येथे शुक्रवार दिनांक 21/07/ 2023 ठीक 11:00 वाजता चक्काजाम आंदोलन घेण्यात येणार आहे.

आंदोलन दरम्यान काही जीवित हानी झाल्यास आपल्या आगार व्यवस्थापक जबाबदार राहिल यांची नोंद घ्यावी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कर्यकर्ते यांची माहिती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button