महाराष्ट्रराजकीयविदर्भसामाजिक

श्री संत नामदेव महाराज चरणी आ अँड फुंडकर झाले नतमस्तक ; पालखी सोहळ्यात झाले सहभागी खामगाव ::-

      स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त शहरातून निघालेल्या भव्य पालखी शोभायात्रेत आ अँड आकाशदादा फुंडकर सहभागी झाले, व ते संत नामदेव महाराज चरणी नतमस्तक झाले. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७३ वा समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त 14 व 15 जुलै रोजी स्थानिक गोपाळ नगर येथील संत नामदेव महाराज मंदिर भवन येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आज सायंकाळी शहरातून टाळ मृदूगाच्या गजरात भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात आ अँड आकाशदादा फुंडकर हेसुद्धा सहभागी झाले. आ अँड फुंडकरांनी पालखीतील संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सहभागी वारकरी बांधवांचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक समितीचे विश्वस्त राजूभाऊ आगरकर ,शिवाजी धिरडे ,वैभव ईश्वरे,विजय दिवसे ,आकाश बडासे ,गौरव दिवसे ,चेतन गोडाळे ,सुभाष देवगिरीकर,संतोष मुळंतकर ,योगिता देवगिरीकर ,जगदेव गोडाळे ,शुभांगी गोरले ,राकेश सुतवणे ,योगेश ईश्वरे ,गौरव जोध ,विजय वरूडकर,सचिन बंड,अभिषेक ईश्वरे, निलेश देवगिरीकर,शाम गोरले,विजय दिवसे,प्रशांत काठोके,शुभांगी गोरले यांचेसह सहभागी शिंपी समाज बांधवांच्या आ अँड आकाश फुंडकर यांनी भेटी घेतल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button