अमोलभाऊंच्या हातून हिंदुत्वाची अखंड सेवेसोबत संघटन अधिक बळकट होवो –

अमोलभाऊंच्या हातून हिंदुत्वाची अखंड सेवेसोबत संघटन अधिक बळकट होवो –आ अँड आकाश फुंडकर ; भाजपच्या वतीने अमोल अंधारे यांचा भव्य सत्कार खामगाव ::-
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
अमोलभाऊ अंधारे यांचे हातून हिंदुत्वाची अखंड सेवेसोबत बजरंग दल संघटन अधिक बळकट होवो असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी केले. अमोलभाऊ अंधारे यांची बजरंग दल च्या विदर्भ प्रांत सहमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यानिमित्ताने त्यांचा भव्य सत्कार भाजपच्या वतीने आज माधव नगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात करण्यात आला. त्यावेळी आ अँड फुंडकर बोलत होते. सर्वप्रथम लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रतिमेला व संत गजानन महाराजांच्या मूर्ती ला अमोलभाऊ अंधारे यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. त्यानंतर आ अँड आकाशदादा फुंडकर व भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागरदादा फुंडकर यांनी शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्री हनुमानाची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी भाजप जिल्हासचिव संजय शिनगारे, डॉ एकनाथ पाटील, खामगाव तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शेगाव तालुकाध्यक्ष विजय भाळतीडक, चंद्रशेखर पुरोहित, प्रमोदसेठ अग्रवाल, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, माजी नगरसेवक राकेश राणा, सतीशअप्पा दुडे, गणेश सोनोने, गणेश जाधव, अशोक हत्तेल, ज्ञानदेवराव चिमणकार, वैभव डवरे, जितेंद्र पुरोहित, सुभाष इटणारे, नगेंद्र रोहनकार, भाजयुमो तालुकाध्यक्ष रुपेश खेकडे, यश आमले, संजय भागदेवाणी, गणेश कोमुकर, रवी गायगोळ, अनिल मेतकर, श्रीबाप्पू देशमुख, आकाश शेळके, गजानन मुळीक, शशांक वक्ते, प्रसाद एडलाबादकर, रुपेश शर्मा, देवा गावंडे, आशिष सुरेका, दिपान्शु भैय्या, संजुभाऊ गुप्ता, योगेश आळशी, विकास चौरे, पवन माळवंदे, पिंटू धोरण, सोनू निभेवणी, विक्की रेठेकर, रोमित जवकार, निवृत्ती नांदोकार, रमेश इंगळे, विक्की हत्तेल, दिलज्योतसिंग संधू, बलजीतसिंग चव्हाण, अक्षय म्हस्के, निकुंज मंदानी, आदित्य जोशी, आकाश काळे, श्रीकांत टाले, गजानन कळमकार, हिरल गोहेल, प्रसन्न पिसे पाटील, अजय खोद्रे, शुभम ठाकूर, श्रीकृष्ण ठाकरे, महादेव फंड, राम शिंदे, विनय पंडा शर्मा, अमोल जोशी, विजय आनंदे, यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देवून अमोलभाऊ अंधारे यांचा सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप, भाजयुमो व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भगवान जय श्री रामाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.



