Uncategorized

*निपाणा गावा कड़े प्रशासनाचे दुरलक्ष्य


  • स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
    निपाणा तालुका खामगाव
    जिल्हा बुलढाणा.
    गावातील मुख्यमार्गावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी गावकऱ्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीही प्रशासन गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे जर आता काम झाले नाही तर गावकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येईल.
    शाळकरी मुलं तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो.
    या घाणीच्या दूषित पाण्यामुळे घरोघरी लहान मुलं लोक आजारी पडत आहेत.
    आमचं गाव हे 100% हागणदारी मुक्त गाव असून लोक याच मुख्य महामार्गावर खुल्या वर शौच करून जातात , त्यामुळे विविध आजार पसरत आहेत.
    शासनाने स्वच्छ भारत मिशन यासारख्या विविध योजनांची अंमलबजावणी केली असून सुद्धा या योजनेचा फायदा आमच्या गावावरती काही दिसून येत नाही.
    आतापर्यंत कित्येक लोक या दूषित सांडपाण्या मध्ये घसरून पडलेले आहेत आणि अजून सुद्धा पडत आहेत याच्यामुळे लोकांची जीवित हानी होण्याचे दाट शक्यता असते याच्यामध्ये आतापर्यंत कित्येक लोक स्त्रिया पुरुष बालके या दूषित पाण्यामध्ये पडून यांना गंभीर दुखापत सुद्धा झालेल्या आहेत. ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे.
    आठ महिने आधी ग्रामपंचायतला निवेदन देऊन सुद्धा कामाची दखल घेतलेली नाही .जर आता रस्त्याचे काम झाले नाही. तर मुख्य जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आमरण उपोषण करू.
    आपलाच
    निपाणा ग्रामवासी ✍️🌱.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button