असाही एक वाढदिवस । दिव्यांग विद्यार्थ्यांन सोबत आनंदाचा दिवस ।।शहापूर – (सचिन शेलवले )दिव्यांगांचे आधारवड सन्माननीय राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त प्रहार अपंग क्रांती संस्था शहापूर व एकलव्य दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने….. अपंग सेवा संस्था संचालित, कर्णबधिर विकास विद्यालय किन्हवली या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून विद्यार्थ्यांच्या हाताने केक कापून विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आली. या वेळी या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव हे खूप मोठं समाधान देऊन गेले.

दिव्यांगांचे विविध प्रश्न, दिव्यांगाना येणाऱ्या विविध समस्या, यावर सदर शाळेने/ संस्थेने प्रहार अपंग क्रांती चे तालुका अध्यक्ष प्रा. नितीन पडवळ यांना एक निवेदन संघटनेस सादर केले.
कर्णबधिर विकास विद्यालय किन्हवली चे प्रभारी मुख्याध्यापक प्रा. रत्नाकर सोनवणे सर यांनी मंत्री बच्चू कडूंचे संघटक म्हणून प्रहार अपंग क्रांतीला व संस्थेच्या पदाधिकारी यांना खूप मोठं मानाचं स्थान दिलं…
दिव्यांगांचे आधारवड राज्यमंत्री बच्चू कडू साहेब यांचा वाढदिवस एका दिव्यांग विद्यालयात साजरा करणे आणि तो ही शहापूर तालुक्यात पहिल्यांदाच हे घडलेले पाहून विध्यार्थी व शिक्षकांचे मन अगदी भारावून आलं…
या भावनेतूनच त्यांनी आमच्या या दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत शिक्षक या नात्याने आपणही संपर्कात राहावे अशी एका दिव्यांग शाळेच्या शिक्षकाने, शिक्षक या नात्याने एका शिक्षकाला अर्थातच प्रा. नितीन पडवळ सर यांना मायेने साद घातली. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर अगदी मित्रत्वाच्या नात्याने आपला व्यक्ती म्हणून त्याने मनापासून चर्चा केली. यावेळी या शाळेचे सहकारी कनिष्ठ लिपिक सौ ज्योत्स्ना ताई, कलाशिक्षक सौ राजश्री गोडांबे ताई, आमचे मित्र प्रा. स्वप्निल जायले सर, सौ. कमल देसले मॅडम या सोबतच अनेक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
यावरून लाडके मंत्री बच्चू कडू यांच्या बद्दल दिव्यांगांमध्ये असणारं प्रेम हे या ठिकाणी ठळक जाणवलं.
प्रहार अपंग क्रांती संस्था शहापूर चे अध्यक्ष प्रा. नितीन पडवळ सर यांच्या माध्यमातून हा बच्चूकडू साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रहार चे संघटक आमचे मित्र व्यावसायिक श्री कैलास बेलवले, श्री रामचंद्र तुंगार साहेब, श्री प्रवीण हुकमाळी यांनी केले.
या कार्यक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष श्री सुभाष गोळे सर, सचिव श्री प्रभाकर देसले, श्री गुरुनाथ मलपेकर, श्री मलिक सर, श्री बाळू म्हसकर यावेळी उपस्थित होते.
प्रहार संघटन व एकलव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून आज या शाळेमध्ये मुलांना केक, बिस्किटे व फळे वाटप करून हा कार्यक्रम निरंतर स्मरणात राहील या पद्धतीने साजरा केला.



