Uncategorized

संत नगरी शेगाव मध्ये दि.29जून 2023..आषाढी एकादशीला ,श्री विठ्ठल रुक्मिणी व शिवलिंग प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळा

*संत नगरी शेगाव मध्ये दि.29जून 2023..आषाढी एकादशीला ,श्री विठ्ठल रुक्मिणी व शिवलिंग प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळा.*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे हेचि व्हावी माझी आस ,जन्मोजन्मी तुझा दास ||पंढरीचा वारकरी , वारी चुकू ने दे हरी ||आषाढी एकादशीचे औचित्य साधून, दि. 29जून2023 रोजी, रोकडिया नगर(पवन गिरी वसाहत ) शेगाव येथे ,स्थानिक नागरिक आणि श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा समितीच्या सहयोगाने , नूतन मंदिरात श्री. विठ्ठल रुक्मिणी आणि श्री शिव लिंग प्राणप्रतिष्ठा.. मंदीर लोकार्पण सोहळा ,संपन्न होत आहे .त्या निमित्त गुरुवार रोजी ..सकाळी 10 ते 11 ..राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, ह.भ.प.डॉ.श्री. ज्ञानेश्वरजी मिरगे गुरुजी शेगाव यांचे प्रवचन आयोजित केले आहे. त्यानंतर श्री. प्रसाद आणि सायंकाळी 5 वाजता शोभायात्रा राहील . नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून , प्रवचन श्रवणाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ..पवन गिरी वसाहत शेगाव यांनी केले आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button