भाजपाने मागील ९ वर्षात केलेल्या कामांचा पर्दाफाश करुन ‘पोलखोल अभियान’ राबविण्याचा संकल्प घ्या- माजी आ. सानंदा

भाजपाने मागील ९ वर्षात केलेल्या कामांचा पर्दाफाश करुन ‘पोलखोल अभियान’ राबविण्याचा संकल्प घ्या- माजी आ. सानंदा स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी राम इंदोरेखामगाव अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष काँग्रेस नेते राहुलजी गांधी हे सर्व सामान्यांची नाळ जुडलेले नेते आहे. राहुल गांधीनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून काँग्रेस पक्षामध्ये चैतन्य निर्माण केले आहे. राहुल गांधीनी केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सातत्याने आवाज उठविला आहे.देशाच्या उज्वल भविश्यासाठी राहुल गांधी यांच्या सारख्या निडर आणि अभ्यासू नेत्याची आज देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे. राहुल गांधी यांच्या वाढदिवशीदिनी काँग्रेसजणानी भाजपाने मागील ९ वीत केलेल्या कामांचा पर्दाफास करण्यासाठी ‘पोलखोल अभियान’ राबविण्याचा संकल्प घ्यावा असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. सोमवार १९ जून रोजी कॉग्रेस पक्ष कार्यालय येथे कॉग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना केले.यावेळी मंचावर महिला प्रदेष कांग्रेस कमिटी सरचिटणीस डॉ. तब्बसुम हुसैन, खामगाव पहर कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासनेखामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज यानखडे, शेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, खामगाव कृशी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाशभाऊ पेसोडे, खामगाव विधानसभा युवक कॉग्रेसचे अध्यक्ष रोहित राजपूत आदीची उपस्थिती होती.पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, आजच्या घडीला गौदी मिडीयाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात आहे. शेतकन्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचे आश्वासन मोदी सरकारने पुर्ण केलेले नाही. देशात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.जनसंपर्क वाढवून राहुलजींचे हात मजबूत करावे असे सांगितले. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाशमाऊ पेसोडे यांनी बोलतांना सांगितले की, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून देशामध्ये कॉंग्रेससाठी वातावरण निर्मिती केली. राहुल जीच्या नेतृत्वात कर्नाटकमध्ये कॉंग्रेसची बहुमताने सत्ता आली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक संस्थेवर कॉग्रेसचा झेंडा फडकवा यासाठी काँग्रेस जणांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे असे सांगितले खामगाव तालुका काँग्रेस कमिटीच अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांनीही मनोगतमोदी सरकारने २०१७ साली जीएसटी कायदा आणुन जन्मापासून मृत्यूपर्यंत लागणाछया प्रत्येक वस्तुवर का लावला आहे. जीएसटीमुळे अनेक छोटे-मोठे उद्योग धंदे उध्वस्त झाले आहे. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी, महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. महागाईने जनता होरपळली जात आहे.देशाप्रमाणे राज्यातही ठिकठिकाणी जाती धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडवली जात आहे. बुलढाणा जिल्हयासह खामगाव मतदार संघात लोकांची पिळवणुक करुन अवैध धंद्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण करून शेतकरी, युवकाचे आयुष्य व्यक्त केले. लालसेपोटी उदध्वस्त केले जात आहे. निकृष्ट दर्जाच्या विकासकामांच्या माध्यमातून खुलेआम टोल वसूली करून जनतेचा विश्वासघात केला जात आहे. या सर्व गोष्टी काँग्रेस जणानी संकल्प अभियानाच्या माध्यमातून घरा-घरापर्यंत पोहचवाव्या व त्याचा पर्दाफाष करुन भाजपा सरकारचा खरा चेहरा समोर आणावा.यावेळी खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे यांनी सांगितले की, जनतेची सेवा करण्यासाठी कॉग्रेस पक्ष सत्तेत कसा येईल यासाठी कॉग्रेस कार्यकत्यांनी पक्ष संघटन मजबूत करावे,यावेळी माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, माजी जि.प.सदस्य गजानन चाकुडकर, बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबरावदादा देशमुख, माजी पं.स. सदस्य मनिश देशमुख, कृउबासचे संचालक विलाससिंग इंगळे, माजी नगरसेवक मो. नईम, माजी नगरसेवक लाला जमदार, हाजी शेख उस्मान, वाडी ग्राम पंचायतचे सरपंच विनोद मिरगे, सुटाळा ग्रा.पं.चे सरपंच निलेश देशमुख, उपसरपंच जयेश वावगे यांच्यासह कॉंग्रेस, युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



