बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक

प्रमुख पाहुणे अनुपस्थित मात्र सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न

प्रमुख पाहुणे अनुपस्थित मात्र सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस व्हि.एम.घोडे तालुका प्रतिनिधी

अकोट दि.20 पारळा तालुका अकोट जिल्हा अकोला चौरंगीनाथ महाराज संस्थान मंदिर (आश्रम )येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय शिक्षण संस्था तेल्हारा जिल्हा अकोला म.र.नं.257 F यांच्या वतीने सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा दिनांक 20 जून मंगळवार रोजी संपन्न झाला .
सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात चौरंगीनाथ महाराज यांचे पूजनाने झाली तसेच शाल श्रीफळ व हारा्र्पन करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.या सोहळ्यामध्ये 28 जोडपी विवाहबद्ध झाले या विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना मा निमा अरोरा जिल्हाधिकारी अकोला यांनी भ्रमणध्वनी द्वारे दिल्या शुभेच्छा या कार्यक्रमांमध्ये विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले सौ हरीदिनी अशोक वाघोडे सभापती पंचायत समिती अकोट तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे अधिकारी माजी नगरसेवक व वंचित बहुजन आघाडीचे गोवर्धनजी पोहरकार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा दोन वाजता च्या सुमारास पंडित गणेश ठोसर यांच्या पौरोहित्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित मंगलाष्टका सह संपन्न झाला ,वधू-वरांच्या सामूहिक विवाह सोहळ्याला आलेल्या वराडी करिता आयोजकांनी अल्प उपहाराची व्यवस्थाही केलेली होती तसेच लग्न मंडपी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या अखत्यारीत विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा प्रमाणित केलेले विवाहाचे प्रमाणपत्र आयोजकांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले मात्र या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार श्री रणधीर सावरकर अकोला जिल्हा अध्यक्ष भाजपा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ भारसाकडे आमदार अकोट प्रमुख पाहुणे डॉ श्री संजय कुटे आमदार जळगाव जामोद श्री आकाश भाऊ फुंडकर आमदार खामगाव मा निमा अरोरा जिल्हाधिकारी अकोला श्री ज्ञानोबा फळ ठानेदार तेल्हारा श्री संतोष येवलीकर तहसीलदार साहेब तेल्हारा यांच्यासह सर्व पक्षाचे राजकीय नेते तसेच लोकप्रतिनिधी हि अनुपस्थित होते
गेल्या तीन महिन्यापासून हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा यशस्वी होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ता निलेश किसनराव पुदाखे तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय शिक्षण संस्था तेल्हारा जिल्हा अकोला महाराष्ट्र चे अध्यक्ष (अनुसूचित जाती) तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय तेल्हाराचे संस्थापक अध्यक्ष नागोरावजी वानखडे यांनी अथक परिश्रम घेतले तसेच या सोहळ्याला चौरंगीनाथ महाराज संस्थान चे अध्यक्ष गोपाळ महाराज साळुंके व समस्त पारळा गावकरी मंडळी व जय हरी भजनी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button