महाराष्ट्र

जिगाव प्रकल्पातील आडोळ शाखेचे उदघाटन व मार्गदर्शन मेळावा संपन्न..

जिगाव प्रकल्पातील आडोळ शाखेचे उदघाटन व मार्गदर्शन मेळावा संपन्न..
बुलढाणा..

स्टार भारत लाईव
तालुका प्रतीनिधी
अनिल मुंढे
खामगाव

विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अविरत संघर्ष संग्राम करित असुन संपूर्ण विदर्भातील प्रकल्पग्रस्तांना संघटित करण्याचा संकल्प संघटनेचा असुन धरण तेथे शाखा या अभियाना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पा अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ या धरणग्रस्त गावातील शाखेचा उदघाटन सोहळा तथा मार्गदर्शन मेळावा नुकतेच दिनांक १९/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.मनोजभाऊ चव्हाण यांचे शुभ हस्ते पार पडला.यावेळी आडोळ तथा परीसरातील शेकडो प्रकल्पग्रस्तांना मनोजभाऊ चव्हाण यांनी मार्गदर्शन केले विदर्भातील प्रकल्पग्रस्तांची एकमेव संघटना कार्यरत असुन लाखोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्तांना संघटीत करून खऱ्या अर्थाने प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाचा लढा तिव्र करण्याचा संकल्प यावेळी शेकडो प्रकल्पग्रस्तांनी केला असुन येणाऱ्या काळात राज्याकर्त्यांना प्रकल्पग्रस्तांची ताकद दाखवून देणार असल्याचे मा.मनोजभाऊ चव्हाण यांनी यावेळी सांगितले.जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक पातळीवरील अनेक समस्या प्रलंबित असुन जिल्ह्यातील जनप्रतिनीधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी प्रश्न उत्तराच्या वेळी सांगितले स्थानिक स्तरावर मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक लावून स्थानिक समस्या निकाली काढू असेही मनोजभाऊ चव्हाण यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संघटनेचे प्रशांत भाऊ मुरादे, संजयभाऊ धोंडे. राजुभाऊ लोनकर, नरेंद्र पांडव सरपंच सौ.मायावती सु.ससाणे पो.पाटील दिनेश राजाने,प्रतिष्ठित नागरिक हरीभाऊ उगले,सुनिल उगले,दिलिप पाटील,भगवान भोजने प्रामुख्याने उपस्थित होते.शाखेचे अध्यक्ष म्हणून भास्कर वानखडे उपाध्यक्ष निलेश उगले तर सचिव म्हणून अनिल पाचपोर यांची निवड करण्यात आली आहे कोषाध्यक्ष विठ्ठल पदमे,सदस्य समाधान उगले,प्रविण चिपडे,एकनाथ बाजोडे,सुभाष उगले,रामभाऊ उगले,गुलाबराव यादगीरे या सर्वांनी जबाबदारी सांभाळली असुन गावातील ईतर सर्व प्रकल्पग्रस्तांचे सभासद अर्ज भरल्या जाणार आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button