बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

भाजपचे भव्य लाभार्थी संमेलन थाटात संपन्न

गोरगरिबांच्या कल्याणासाठीच पंतप्रधान मोदींचे कार्य — आ अँड आकाश फुंडकर

भाजपचे भव्य लाभार्थी संमेलन थाटात संपन्न

 स्टार‌ भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

खामगाव ::- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची 9 वर्षाची कारकीर्द गरजू, गोरगरीब, समाजातील शेवटच्या घटकांच्या कल्याणासाठी केली, आणि पुढेही चालूच राहील असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी केले. मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत खामगाव विधानसभा मतदार संघाचे सेवा, सुशासन, गरीब कल्याण लाभार्थी संमेलन आज 20 जून रोजी स्थानिक कोल्हटकर स्मारक सभागृहात पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना आ अँड फुंडकर बोलत होते.
मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान खामगाव मतदार संघात 18 जून पासून सुरू झाले आहे. या अंतर्गत आज खामगाव विधानसभा मतदार संघातील लाभार्थ्यांचे भव्य संमेलन पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ अँड आकाश फुंडकर होते , तर मंचावर भाजप सोशल मिडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर , किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख, जिल्हा सचिव संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, खामगाव तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शेगाव तालुकाध्यक्ष विजय भालतीडक, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, डॉ एकनाथ पाटील, माजी नगराध्यक्षा सौ अनिता डवरे, प. स. सभापती सौ उर्मिला गायकी, सौ रेखा जाधव, सौ रत्नाताई डिक्कर, राजेंद्र देवचे, ज्ञानदेव मानकर, पुरुषोत्तम ढोण, विलास काळे, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, तालुकाध्यक्ष रुपेश खेकडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, वैभव डवरे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पंतप्रधान आवास योजना, जन मृत्यू प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र , फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधी, करदात्यांना ट्री गार्ड, अपंगांना रेशन कार्ड, शेतकऱ्यांना अनुदानित ट्रॅक्टर, कांदाचाळ, महिला बचत गटांना कर्ज वितरण, दुधाळ जनावरे वाटप, मुद्रा लोन वाटप, आदी शासकिय योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना थेट लाभ प्रमाणपत्र वाटप आ अँड आकाश फुंडकर, सागरदादा फुंडकर व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना आ अँड आकाश फुंडकर म्हणाले की गेल्या 9 वर्षाच्या

कार्यकिर्दीत पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामावर भर दिला. अन्न, वस्त्र , निवारा यासह स्वतःच्या पायावर गरिबांनीही उभे राहावे यासाठी अनेक योजना केंद्र सरकार राबवित आहेत. महिला बचतगट असो की इतर छोटा व्यवसायिक यांना नोकर पासून मालक बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी काम केले आहे. उज्वला गॅस योजना,प्रत्येकाला पाणी मिळावे यासाठी हर घर नल, हर घर जल जल योजना, आरोग्यासाठी आयुष्यमान भारत , महात्मा फुले योजना, या अंतर्गत 5 लाख पर्यंत शस्त्रक्रिया, तसेच शिक्षण, व इतर सर्व क्षेत्रातील योजना केवळ गोर गरीब जनतेसाठी प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. कोरोना काळात सर्वांना मोफत लस व उपचार दिले, केवळ देशातच नव्हे तर जगातील शंभरहून अधिक देशांना लस पुरवून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मानवतेचे आणि नव्या शक्तिशाली
भारताचे दर्शन घडविले. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आज मोदींमुळे देशाचे नाव मोठे झाले आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी अर्पित केले आहे. खामगाव मतदार संघातील कोणत्याही गोर गरीब यांचे काहीही समस्या व काम असल्यास वैयक्तिक माझ्याशी किंवा तुमच्या जवळच्या भाजप पदाधिकारी यांचेशी थेट संपर्क साधावा असे आवाहन आ अँड आकाश फुंडकर यांनी केले . या संमेलनाचे प्रस्ताविक शरदचंद्र गायकी, संचालन विजय महाले, वैभव डवरे, तर आभार प्रदर्शन सुरेश गव्हाळ यांनी केले. या लाभार्थी संमेलनात विविध शासकीय विभागाचे शेकडो लाभार्थी उपस्थित होते. शासकीय योजनेचा लाभ तात्काळ मिळाल्या बद्दल अनेक लाभार्थ्यांनी आ अँड आकाश फुंडकर यांचे आभार मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button