बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जिल्ह्यातील सर्व बचतगटांच्या निर्मित वस्तू विक्री व वितरणसाठी मोक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था उभारणार-

*जिल्ह्यातील सर्व बचतगटांच्या निर्मित वस्तू विक्री व वितरणसाठी मोक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था उभारणार- खा.प्रतापराव जाधव*

स्टार भारत लाईव
तालुखा प्रतीनिधी
अनिल मुडे
खामगाव
आज दिनांक 18 जून 2023 रोजी योगीराज लाँन्स,खामगाव येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान पं स खामगाव व शेगाव अंतर्गत महिला स्वयंयसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विपणन मार्गदर्शन व बँक कर्ज वाटप मेळावा शिवसेना नेते खासदार मा.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी केले. यामध्ये त्यांनी बँक कर्ज मंजूर निधीतून करता येणारे व्यवसाय, अभियानाचे पुढील नियोजन तसेच PMFME, POCRA, CMEGP यासारख्या शासकीय योजनांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीबाबत मार्गदर्शन केले. तसेच अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत वाढविणेबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमदार मा.श्री.आकाश
दादा फुंडकर यांनी बचत गटांनी बनविलेला माल आकर्षक ब्रांडीग व पेकेजिंग सह तयार केल्यास त्याना चांगली किंमत व बाजारपेठ उपलब्ध होईल. आपल्या महिलांनी आपल्या मालाची आकर्षक पेकिंग व ब्रांडीग करून चांगल्या बाजारपेठेकडे पाहावे असे उदाहरण दिले तसेच समूह हे मोठे संघटन असून या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना नक्कीच प्रगती साधता येईल तसेच शेवटच्या घटकातील महिलेला सुद्धा निर्णय प्रक्रियेत सहभाग व आत्मसम्मान मिळून देणारी योजना म्हणून उमेद कडे पाहता येईल असे विचार व्यक्त केले.
यानंतर अध्यक्षीय भाषणातून मा खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले मी केंद्रीय ग्राम विकास समितीचा अध्यक्ष असताना देशभरातील ब-याच राज्यातील महिला बचत गटांचा अभ्यास केला असता असे लक्षात आले कि महिलानी बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेवर भरतात व त्या पैश्यातून जो उद्योग उभा करतात त्याच्या उत्पादनही दर्जेदार असते परंतु त्यांनी तयार केलेल्या मालाला विक्री व्यवस्था व विपणन प्रणाली नसल्यामुळे त्या महिलांचे उद्योग बंद पडतात किंवा विस्कळीत होतात त्यावरच तोडगा म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याततालुका पातळीवर लवकरच साठ लाख रुपये किमतीचे कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू करण्याचा तसेच समूहांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ मिळावी याकरिता प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र उभारण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन व ऍमेझॉन, फ्लिपकार्ट च्या माध्यमातून ऑनलाईन प्लॅटफॉर्म समूहांना मिळून देण्याचा मानस व्यक्त केला.
तसेच जिल्ह्यातील समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जिल्हा पातळीवर ग्रामीण mall उभारण्याचे नियोजन केले आहे व त्याच उत्पादनांचे जिल्ह्यासाठी एकच ब्रँड ही संकल्पना अस्तित्वात आणणार, वनधन योजना व TRIFED च्या माध्यमातून आदिवासी उपजीविका उपक्रम सक्षम करण्यावर भर देण्याबाबत आश्वासन दिले. तसेच समूहातील महिलांना उद्योग व्यवसाय विषयक अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा स्तरावर उपजीविका मदत कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती दिली. खामगाव येथे SMART प्रकल्पा अंतर्गत स्थापन झालेल्या स्वयंस्पुर्ती शेतकरी उत्पादक कंपनी करीता उद्योगासाठी कायम स्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा मा महोदय यांनी केली.
PMSBY व PMJJBY या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ सर्व महिलांनी घेण्याबाबतचे आवाहन मा अध्यक्ष महोदय यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रशेखर जोशी साहेब व आभार प्रदर्शन जया विरोकार यांनी केले.
सदर कार्यक्रमास पंचायत समिती खामगावचे गट विकास अधिकारी श्री. चंदनसिंग राजपूत,शेगाव पं स चे गट विकास अधिकारी श्री सतीश देशमुख साहेब, शेख साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी,शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू मिरगे,शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वावगे, शिवसेना तालुका प्रमुख रामा पाटील,निलेश देवताळू युवासेना उपजिल्हा प्रमुख,उमेश पाटील माजी तालुकाप्रमुख, राजेंद्र बघे युवासेना तालुकाप्रमुख, रमेश भट्टड शिवसेना शहरप्रमुख,युवासेना शहरप्रमुख राहुल कळमकार इंदुताई राणे अध्यक्ष महिला आघाडी, विजू पाटील,जिल्हा व्यवस्थापक विक्रांत जाधव, तालुका अभियान व्यवस्थापक अनिता सोळंके मैडम, श्री राजेश बोबडे (शेगाव), तालुका व्यवस्थापक श्री.स्वप्नील आराख व श्रीमती वंदना हिवाळे, तालुका अभियान कक्ष खामगाव व शेगाव मधील सर्व कर्मचारी व कॅडर उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button