*प्रहार’ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

‘ *प्रहार’ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार* (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) *शेगाव* विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची व प्रेरणेची थाप पडावी, या हेतूने प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्याच्या घरी भेट देवून त्यांचा सन्मान केला.शहरातील रोकडिया नगर येथील रहिवासी राज इंगळे व जयवंतराव वानखडे या शिक्षकांच्या मुलांनी नीट परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. नीट परीक्षेत विकर्तन राज इंगळे याने ७२० पैकी ६४३ तर शीतल जयवंतराव वानखडे हिने ५२४ गुण प्राप्त करून वैद्यकीय क्षेत्रात आपला प्रवेश निश्चित केला आहे. वैद्यकीयगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी.क्षेत्रात यशस्वी होऊन रुग्णसेवा करण्याची मनीषा त्यांनी व्यक्त केली आहे. विकर्तन हा भारतीय बहुजन महासंघ महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा वर्षा राज इंगळे यांचा मुलगा आहे. तर शीतल वानखडे हो त्यांच्या भावाची मुलगी आहे. त्यामुळे राजकीय, सामाजिक वशैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील घावट, विजय टापरे, प्रशांत नागे, गटसाधन केंद्राचे विषय शिक्षक विक्रम फुसे, योगेश गणोरकार, विनोद वैतकार, श्रीकांत सोनोने आदी उपस्थित होते.



