महाराष्ट्रमुबईराजकीय

ठाण्यात प्रकल्प उद्घाटनांचा पुन्हा धडाका.

ठाण्यात प्रकल्प उद्घाटनांचा पुन्हा धडाका. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर ठाणे येथील किसननगर भागातील क्लस्टर योजनेचा शुभारंभ तसेच दिवा परिसरातील विविध लोकोपयोगी प्रकल्पांचे भुमीपुजन व उदघाटनांचा बार काही दिवसांपुर्वीच उडाला असतानाच, त्यापाठोपाठ आता राज्य सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्ताने येत्या २५ जून रोजी ठाण्यात विविध प्रकल्पांचे भुमीपुजन आणि उदघाटन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शिंदे यांच्या शिवसेनेने शहरात लोकोपयोगी प्रकल्पांचा धडाका लावल्याचे चित्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमांच्यानिमित्ताने शिवसेना पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करीत आहे.ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यातून मुख्यमंत्री शिंदे यांना मोठे समर्थन मिळाल्याचे दिसून आले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button